गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (15:12 IST)

'अंतिम: द फाइनल ट्रुथ'चे पहिले गाणे 'विघ्नहर्ता' प्रदर्शित

सलमान खान, आयुष शर्मा आणि वरुण धवन या गणपतीत दर्शकांना  थिरकवणार 'विघ्नहर्ता'च्या तालावर!
 
'विघ्नहर्ता'च्या टीजरने दर्शक आणि चाहत्यांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता, संपूर्ण ट्रॅक रिलीज झाला आहे आणि याला मिळणारा दर्शक आणि चाहत्यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'ची हाय-ऑन एनर्जी फेस्टिव डांस ट्रॅकमध्ये सलमान खान, आयुष शर्मा आणि वरुण धवन असणार आहेत.
 
टीजरला दर्शकांसाठी प्रदर्शित केल्यानंतर, याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून कलाकारांच्या चाहत्यांकडून याचे भव्य स्वागत होत आहे. या ट्रॅकमध्ये वरुण आणि आयुष यांच्या ऊर्जावान डांस स्टेप्स असून कानसेनांसाठी एक कर्णमधुर पर्वणी आहे.
 
ट्रॅकचा टोन आणि व्हिज्यूअल्सची भव्यता शानदार असून यातील रंगसंगतीला शाही आणि अलंकारीकतेने दर्शविण्यात आले आहे, जो निश्चितपणे दर्शकांचे लक्ष्य आपल्याकडे आकर्षित करेल आणि त्यांच्या मनात आपले खास स्थान निर्माण करेल.
 
"अंतिम: द फाइनल ट्रुथ" सलमान खान फिल्म्सद्वारे प्रस्तुत आणि सलमा खान यांच्याद्वारे निर्मित आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.