संबंधित माहिती
- कपिल शर्माच्या घरी चिमुकल्याचं आगमन
- अभिनेता सोनू सूदकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान
- वडील शाहरुख खान यांच्यासमवेत चमकदार लाल कारमध्ये सुहाना खान विमानतळावर आली
- 'सत्यमेव जयते 2' ची रिलीज डेट आऊट
- इंस्टाग्राम रीच लिस्ट 2020: भारतीय सेलिब्रिटीमध्ये केवळ प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली यांनाच स्थान मिळाले
‘विरूष्का’च्या मुलीचं नाव कळलं का, अनुष्काने शेअर केला फोटो
क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात ११ जानेवारी रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. अनुष्काने मुलीला जन्म दिला ही आनंदाची बातमी विराटने ट्विट केली होती. तेव्हा त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवलं असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता अनुष्काने ट्वीट करत एक फोटो शेअर करत मुलीचे नाव सांगितले आहे.
अनुष्काने ट्वीट करत पती विराट आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यात त्यांच कुटुंब आनंदी दिसत असून अनुष्काने लिहिले की We have lived together with love , presence and gratitude as a way of life but this little one , Vamika Red heart has taken it to a whole new level !
Tears , laughter , worry , bliss - emotions that have been experienced in a span of minutes sometimes !
ट्वीट करत अनुष्काने त्यांच्या मुलीचे नाव वामिका असल्याचे सांगितले आहे. अनुष्काने अजून एक ट्वीट केले ज्यात म्हटले की तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आर्शिवादासाठी आम्ही आभारी आहोत.
We have lived together with love , presence and gratitude as a way of life but this little one , Vamika ❤️ has taken it to a whole new level !
— Anushka Sharma (@AnushkaSharma) February 1, 2021
Tears , laughter , worry , bliss - emotions that have been experienced in a span of minutes sometimes ! pic.twitter.com/pOe2GQ6Vxi
विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी विवाह बंधनात अडकले होते. ११ जानेवारी 2021 रोजी लग्नाच्या तीन वर्षांनंतर अनुष्काने मुलीला जन्म दिला.
