शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2024 (16:41 IST)

Munjya Trailer: मुंज्याची अपूर्ण प्रेमकहाणी, लग्नासाठी मृत्यूनंतर तडफडणारा आत्मा, हॉरर-कॉमेडीचा धमाकेदार ट्रेलर

Munjya Trailer: स्त्री आणि भेडिया सारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जाणारा मॅडॉक फिल्म्स आपला नवीनतम हॉरर-कॉमेडी मुंज्या रिलीज करण्यासाठी सज्ज झाला आहे. शर्वरी, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज तुम्हाला मोठ्या पडद्यावर हसवण्यासह घाबरवतील. यात मराठी कलाकारांची फौज देखील पाहायला मिळणार आहे ज्यात सुहास जोशी, रिसका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये या कलाकरांची महत्त्वाची भूमिका दिसून येत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्याचा धमाकेदार ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात भारतातील पहिला CGI अभिनेता 'मुंज्या' आहे.
 
मुंज्याचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
2 मिनिटे आणि 18 सेकंदाचा ट्रेलर भारतातील सर्वोत्कृष्ट CGI अभिनेता मुंज्याभोवती फिरतो. ट्रेलर त्याला त्याच्या संपूर्ण वैभवात दाखवले गेले असून त्याच्या अभिनयाने तुम्ही थक्क व्हाल. चेटूकवाडी ठिकाणाची कथा ट्रेलरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. खरं तर हे ठिकाण शापित आहे, कारण मुंज्याच्या अस्थी इथे आहेत. कथेबद्दल सांगायचे तर, मुंज्याला लग्न करायचे होते, पण त्याचा मृत्यू होतो. आता तो आपली शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी इकडे तिकडे भटकतो आणि सर्वांना त्रास देतो.
 
आता मुंज्याची अपूर्ण इच्छा पूर्ण होणार की नाही, हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना कळेल. ट्रेलरमधील पार्श्वभूमीतील आवाज तुम्हाला घाबरायला भाग पाडतील. मोना सिंगचा अभिनय आणि जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी तुम्हाला हसायला लावेल. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
 
चाहत्यांनी ट्रेलरचे कौतुक केले
हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले. यूजर्सचे म्हणणे आहे की भीतीसोबतच खूप मजाही असणार आहे. मुंज्याची प्रेमकथा ज्यात तो मुन्नीला लग्नासाठी शोधत आहे फार मजेदार असणार आहे.