मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (13:25 IST)

पूनम पांडेचा नवरा सॅम बॉम्बे कोण आहे?

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पूनम पांडेने पतीवर मारहाणीचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर गंभीर जखमी झालेल्या पूनमलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या डोक्यावर, डोळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा आहेत. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सॅमविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र पूनम पांडेने पतीवर गंभीर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिने हनीमूनवेळी पतीला तुरुंगात पाठवलं होतं. जाणून घ्या कोण आहे सॅम बॉम्बे? 
 
सॅम बॉम्बे कोण आहे
सॅम बॉम्बे यांचा जन्म दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे झाला. 37 वर्षीय सॅमचे पूर्ण नाव सॅम अहमद बॉम्बे आहे. पूनमच्या आधी सॅमचे लग्न एली अहमदशी झाले होते, जी एक मॉडेल आहे. दोघांना दोन मुले आहेत.
 
काय काम करतो?
 
सॅम बॉम्बे हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. यासोबतच तो अनेक अॅड फिल्म्सचा निर्माता आहे. दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, अक्षय कुमार, रणबीर कपूर, तमन्ना भाटिया यांसारख्या अनेक बड्या फिल्म स्टार्ससोबत त्याने प्रोजेक्ट केले आहेत.
 
पूनम पांडेशी लग्न
पूनम पांडे आणि सॅम यांनी अडीच वर्षे एकमेकांना डेट केले. यानंतर दोघांनी 10 सप्टेंबर 2020 रोजी गुपचूप लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांनी दोघेही हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. ज्याचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर जोरदार शेअर केले होते.
 
लग्नाच्या 13 दिवसांनंतर जेल
पूनम पांडेच्या लग्नानंतर अवघ्या 13 दिवसांतच दोघांमध्ये इतके भांडण झाले होते की, पती सॅमला तुरुंगवास भोगावा लागला होता. पूनमने पती सॅम बॉम्बेवर विनयभंग आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तिच्या पतीला गोवा पोलिसांनी अटक केली होती.