मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (11:32 IST)

अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला !

सुपरस्टार अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा फडकावत आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा हा चौथा चित्रपट असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 4 दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 100 कोटींहून अधिक झाली असून चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला. चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा जुने चैतन्य परत आले आहे.
 
 कोविडपासून चित्रपटगृहे बंद होती आणि ती उघडली तरी लोक चित्रपटगृहात जाण्यास टाळाटाळ करताना दिसत होते.
'सूर्यवंशी' प्रदर्शित झाल्यानंतर हे चित्र बदलले आहे. पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये गर्दी पाहायला मिळत असून तेच चैतन्य पुन्हा पाहायला मिळाले आहे.या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगण देखील काम करताना दिसणार आहेत.