बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:21 IST)

Katrina Kaif And Vicky Kaushal Roka: कतरीना कैफ आणि विक्की कौशलचा रोका सोहळा झाला

कतरीना आणि विकी कौशल यांचा रोका सोहळा अतिशय सुंदरपद्धतीने आयोजित केला होता.हा रोका सोहळा एक था टायगरचे दिग्दर्शक कबीरखान यांच्या घरी दिवाळीच्या समारंभात झाला. कतरीना कबीर खान यांना आपला भाऊ मानते आणि कबीर आणि त्यांच्या पत्नी मिनी माथूर यांचे कतरिनाशी कुटुंबासारखे संबंध आहेत. त्यांनी दोघांनी हा सोहळा अतिशय सुंदरपणे आयोजित केला होता. या सोहळ्यात विकी आणि कतरिनाचे कुटुंबीय उपस्थित होते. या सोहळ्यासाठी कतरिनाने सुंदर लेहंगा परिधान केला होता. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा करण्याचे दोघांच्या कुटुंबीयांनी ठरविले. विकी आणि कतरीना डिसेंबर मध्ये लग्न करण्याचे वृत्त समजले आहे. यांचे लग्न आधी परदेशात होणार होते. परंतु वेळेअभावी हे भारतात लग्न करणार.त्यांचे लग्न शाही पद्धतीने राजस्थानमधील एका किल्ल्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. लग्नानंतर कतरीना टायगर 3 चित्रपटात काम करत आहे तर विकी कौशल हा सॅम बहादूर या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.