बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 30 जुलै 2023 (12:11 IST)

वरुण धवन-जान्हवी कपूरच्या सिनेमावरून इतका 'बवाल' का होतोय?

एका ज्यू संघटनेनं अमेझॉन प्राइमला पत्र लिहून नुकताच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट 'बवाल'चं स्ट्रीमिंग सर्व्हिस प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची विनंती केली आहे.
 
चित्रपटात ज्यूंच्या नरसंहारचं (holocaust) वास्तव चित्रण करण्यात आलं नाही,असा आरोप संघटनेनं केलाय.साइमन वीजेंथनाल सेंटरनं म्हटलं आहे की, लाखो लोकांची पद्धतशीर हत्या आणि छळ चित्रपटात हलक्या पद्धतीनं दाखवण्यात आलाय.
 
या रोमँटिक सिनेमात ज्या प्रकारे नरसंहाराचं चित्रण दाखवण्यात आलंय,त्यावर भारतात ही अनेकांनी टीका केली आहे.मात्र चित्रपटाचे कलाकार आणि दिगदर्शक यांनी ही टीका अयोग्य असल्याचं म्हटलंय.
 
हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्राइम व्हीडिओवर प्रदर्शित झाला.नायकाच्या प्रेमकथेची तुलना नरसंहाराशी करणारी दृश्य आणि संवाद असल्यानं चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांनीही यांनीही टीका केली होती.
 
या चित्रपटात नाझी काळातील गॅस चेंबरमधील एक काल्पनिक दृश्य चित्रित करण्यात आलं आहे, यात नाझी हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलर आणि 'ऑस्त्विझ डेथ कॅम्प'चा ड्रामा म्हणून वापर करण्यात आला आहे.
 
या कथेत प्रमुख भूमिकेत अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर आहेत.युरोपला गेलेल्या नवविवाहित जोडप्याची भूमिका ते करत आहेत.
 
नायक इतिहासाचा शिक्षक आहे आणि इंस्टाग्राम रीलद्वारे त्याच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या महायुद्धाची ओळख करून देण्याचा त्याचा उद्देश आहे. तर नायिका आपलं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत असते.
 
बॉलिवूडच्या कामगिरीचा मागोवा घेणाऱ्या एका वेबसाईटनं 'बवाल'ला व्यावसायिक हिट म्हणून घोषित केलीय. 60 ते 70 लाख लोकांनी तो चित्रपट पहिल्याचं या वेबसाईटनं सांगितलंय. गुरुवारी प्राइम व्हीडिओ अॅपवर टॉप-10 यादीत या सिनेमाचा समावेश करण्यात आलाय.
 
कोणत्या दृश्यावर टीका होत आहे?
रिलीज झाल्यापासून हा चित्रपटाला त्याला झालेल्या विरोधामुळं चर्चेत आहे. याला सकारात्मक रिव्ह्यू मिळाले नाहीत. समीक्षकांचं म्हणणं आहे की, हॉलोकास्टची कल्पना आणि डायलॉग या सिनेमात समाविष्ट करणं योग्य वाटलं नाही.
 
एका दृश्यात हिटलरचा वापर मानवी लोभ दाखवण्यासाठी करण्यात आला होता.नायिकेच्या भूमिकेत असलेली जान्हवी कपूर म्हणते की, आपण पण सगळे एका छोट्या हिटलरप्रमाणेच आहोत, आहोत ना? असा डायलॉग यात आहे. दुसऱ्या डायलॉगमध्ये नायिका म्हणते,"प्रत्येक नातेसंबंध स्वतःच्या 'ऑस्त्विझ'मधून जातात.
 
यात जर्मनीच्या नाझी काळातील सर्वात मोठ्या डेथ कॅम्पचा संदर्भ आहे, यात सुमारे दहा लाख ज्यू मारले गेले होते. हा भयपट पुन्हा तयार करण्यात आला आहे. जिथं ते दोघं गॅस चेंबरमध्ये दाखवण्यात आले आहेत. तिथं त्यांच्या सभोवतालचे लोक गुदमरताहेत आणि ओरडत आहे, असं दृश्य आहे.
 
मंगळवारी ज्यू मानवाधिकार संघटना साइमन वीजेंथनाल सेंटरनं एक निवेदन प्रसिद्ध केलं यात म्हटली की, 'ऑस्त्विझ'चा वापर चित्रपटाच्या कथेसाठी म्हणून करू नये, ऑस्त्विझ म्हणजे वाईट घटना आहे.
या संघटनेनं निवेदनात म्हटलंय की, "दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी चित्रपटातील नायकाच्या तोंडून असा डायलॉग बोलून घेतलाय. प्रत्येक नातं आपल्या ऑस्त्विझमधून जातं. असं सांगून 60 लाख लोकांच्या हत्येची खिल्ली उडवलीय. हिटलरच्या छळछावणीत यातना भोगलेल्या लोकांच्या स्मृतींना हिणवण्याचा हा प्रकार आहे."
 
"जर प्रसिद्धी मिळवण्यासाठी चित्रपटात नाझी डेथ कॅम्पचं कल्पना रम्य दृश्य टाकण्याचा उद्देश निर्मात्याचा असेल, तर तो उद्देश यशस्वी झालाय."
 
त्यांनी आपल्या निवेदनात प्राइमला हा चित्रपट ताबडतोब थांबबवण्यास आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात सांगितलं आहे.
 
चित्रपट निर्मात्यानं यावर अजून कोणतंही वक्तव्य दिलेलं नाही,तर वरूण धवनने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, हिंदी चित्रपटांमधील छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक बोलतात, पण इंग्रजी सिनेमाबाबत मात्र तसं होताना दिसत नाही."
 
दिग्दर्शक नितेश तिवारी सांगतात की, "चित्रपट हा इतक्या बारकाईने बघू नये, कारण मग प्रत्येक दृश्यात तुम्हाला काही ना काही समस्या दिसेल."
'ऑस्त्विझ नाझी कॅम्प' म्हणजे काय ?
 
दुसऱ्या महायुद्धात 1940 से 1945 दरम्यान दक्षिण पोलंडमध्ये असलेल्या 11.1 दशलक्ष लोक मारली गेली, ज्यात बहुतेक ज्यू होते.
 
40 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या कॅम्पचं बांधकाम 1940 मध्ये सुरु करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये रोमा जिप्सी, अपंग, समलैगिंक, पोलंडमधील गैर ज्यू आणि सोव्हिएत युनियन मधले कैदीही ठेवण्यात आले होते.
 
27 जानेवारी 1945 रोजी सोव्हिएत युनियनच्या रेड आर्मीनं -ऑस्त्विझ बर्केनाउला मुक्त केलं होतं. 1947मध्ये त्याचं संग्रहालय करण्यात आलं, त्याच्या देखभालीसाठी पैसे गोळा करण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागला होता. कैद्यांना ठार मारण्यापूर्वी त्यांचा केलेला छळ आणि अत्याचार यांच्याशी संबंधित आठवणी संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या दस्तऐवजात या छळ छावणीचं वर्णन आहे.
 
या दस्तऐवजात पहिल्या युक्रेनियन आघाडीच्या 60 व्या लष्करी तुकडीचे जनरल क्रॅमनिकोव्ह यांचं विधान ही समाविष्ट करण्यात आलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा जवानांनी या छळ छावणीचं गेट उघडलं तेव्हा असंख्य लोकांना जमाव बाहेर आला.
 
जनरलच्या म्हणण्यानुसार, "ते सगळे खूप थकलेले दिसत होते, राखाडी केसांचे पुरुष, तरुण, स्त्रियांच्या हातातील लहान मुलं, हे सर्व जवळ जवळ अर्धनग्न अवस्थेत होते."
 
"ऑस्त्विझ कॅम्पमध्ये लाखो कैद्यांकडून शेवटच्या श्वासापर्यंत काम करून घेण्यात आलं किंवा त्यांना गोळ्या घालण्यात आल्या."
 




Published By- Priya Dixit