शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (16:08 IST)

विद्या बालन चित्रपटसृष्टी का सोडण्याच्या विचारात होती?

अभ्यासू अभिनेत्री म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या विद्या बालन हिचा आज वाढदिवस आहे. विद्याच्या नावावर आतापर्यंत अनेक आशयघन चित्रपट जमा झाले आहेत. मात्र, एक काळ असा होता की, जेव्हा विद्या बालन चित्रपटसृष्टीला राम राम ठोकण्याच्या विचारात होती.
 
'हे बेबी' आणि 'किस्मत कनेक्शन' या सिनेमांनंतर विद्या बालनच्या वजनावरून आणि कपड्यांवरून तिच्यावर टीका झाली होती. हा काळ आठवत विद्या म्हणते, "एवढी टीका होत असताना मनात विचार यायचा की, मग याआधी माझं कौतुक व्हायचं तो केवळ योगायोग होता का? कारण याच दरम्यन दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतही विद्यावर काही प्रमाणात टीका होत होती."
 
विद्या सांगते, "मला वाटू लागलं होतं की, मी या चित्रपटसृष्टीसाठी योग्य नाहीय का? मला वाटू लागलं होतं की, मला आणखी कणखर व्हावं लागेल आणि चित्रपटसृष्टी सोडून जावं लागेल."
'पा', 'डर्टी पिक्चर' किंवा 'कहानी' यांसारख्या चित्रपटांची विद्या बालनशिवाय कल्पनाही करता येत नाही.
करिअरच्या सुरुवातीला 'परिणिता' आणि 'मुन्ना भाई...' यांसारख्या चित्रपटांमुळे विद्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं.
 
आजच्या घडीला कुठल्याही महिलाप्रधान चित्रपटासाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती विद्या बालनलाच दिसून येते. मात्र, या ठिकाणी पोहोचण्याचा विद्याचा प्रवास सहज-सोपा नक्कीच नव्हता.
 
विविध प्रकारच्या टीकांना तोंड देत विद्या इथवर पोहोचलीय. या सगळ्याचा श्रेय विद्या बालन तिच्या जिद्दीला देते.
 
विद्या म्हणते की, "मी मनाने खूप धीट आहे. इतक्या टीकांनंतरही मी बदलली नाही. त्यामुळेच मी 'विद्या बालन' आहे."
 
विद्या बालन तिच्या चित्रपटांप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही आपल्या बिनधास्त वृत्तीमुळे ओळखली जाते. विद्याचे सलग काही चित्रपट अयशस्वी सुद्धा ठरले. मात्र, त्यातूनही शिकून पुढचा प्रवास करण्याकडे तिचा कल असतो.
 
'यशस्वी लोकांमागे दुनिया धावते....'
विद्या सांगते की, आमीर खानमुळे जेव्हा माझा अहंकार दुखावला गेला होता तो दिवस आजही विसरता येत नाही.
"मी एका शोकसभेत गेली होती. तिथं चित्रपटसृष्टीतील केवळ मी एकटीच उपस्थित होती. माध्यमं माझे फोटो काढू लागले. मात्र, जेव्हा आमीर खान आला, तेव्हा माध्यम प्रतिनिधी मला धक्का मारत बाजूला सारून आमीरकडे गेले. ते
 
व्हा मात्र मला एक कळलं की, जो जास्त यशस्वी असतो, लोक त्याच्या मागे धावतात. मला त्यावेळी वाईट नक्कीच वाटलं, पण आता मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही," असं विद्या सांगते.
 
यश-अपयशांचे चढ-उतार पाहिलेल्या विद्याला चित्रपटांमध्येही अशीच चढ-उतार असलेल्या कथानकांमध्ये काम करायला आवडतं. कमकुवत गोष्टींवर मात करून यश मिळवणाऱ्यांच्या कथा विद्याला प्रेरणा देतात.