सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (15:28 IST)

ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करची गळफास घेऊन आत्महत्या

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिचा मृतदेह तिच्या घरात सापडला आहे.वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या अभिनेत्री वैशाली ठक्करने तिथे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.वैशाली ठक्करने प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये काम केले आहे.याशिवाय ती 'ससुराल सिमर का' या लोकप्रिय मालिकेतही दिसली आहे.काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जात आहे की, पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली आहे.प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.वैशालीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने तेजाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैशाली जवळपास एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती.

नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये ती 'दिल जिगर नजर क्या है मैं तो तेरे लिए जान भी दे दूं' गाताना दिसली.या व्हिडिओमध्ये ती हसत होती आणि आनंदी दिसत होती. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे.
 
आता अचानक तिचा मुतदेह पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.