1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 16 मार्च 2025 (12:28 IST)

वायआरएफ ने शेअर केला वॉर 2 चा भन्नाट फॅन-मेड व्हिडिओ, म्हणाले – 14 ऑगस्टला सिनेमागृहांत होणार धुमाकूळ!

YRF shares awesome fan-made video
मोठ्या पडद्यावर तुफान अॅक्शन आणि थरार पाहायला मिळणार आहे, कारण हृतिक रोशन ऊर्फ कबीर आणि एनटीआर ज्युनियर आमने-सामने येणार आहेत वॉर 2 मध्ये! ही चित्रपट ब्लॉकबस्टर वायआरएफ स्पाय युनिव्हर्स मधील वॉर फ्रेंचाइज़ी ची दुसरा भाग आहे.  
यशराज फिल्म्स (YRF) ने वॉर 2 बद्दल चाहत्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होत एक जबरदस्त फॅन-मेड व्हिडिओ शेअर केला, जो हृतिक आणि एनटीआर ज्युनियर यांच्यातील तीव्र प्रतिस्पर्धा अधोरेखित करतो.  
 
 
 
वायआरएफ च्या या पोस्टने वॉर फ्रेंचाइज़ी, हृतिक रोशन,  एनटीआर ज्युनियर आणि वायआरएफ स्पाय युनिव्हर्स च्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. या व्हिडिओने वॉर 2 साठीची प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवली आहे.  
वॉर 2 ही वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट आहे. याआधी एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण आणि टायगर 3 या फ्रेंचाइज़ीतील सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत.