शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑगस्ट 2015 (09:45 IST)

असिन लग्नबंधनात

असिन
बॉलीवूडमधील आणखी एक अभिनेत्री बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाली आहे. आमिर खानच्या ‘गजनी’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री असिन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
 
नामांकित मोबाइल कंपनी मायक्रोमॅक्सचा संस्थापक राहुल शर्मासोबत असिन विवाहगाठ बांधणार आहे. राहुल शर्मा यांनी अवघ्या 36 व्या वर्षी एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली आहे.
 
असिनने अद्याप लग्नाच्या बातम्यांबाबत मौन बाळगलं आहे. मात्र असिनचं मित्रमंडळ आणि जवळच्या नातेवाइकांनी असिनच्या लग्नाबाबतची माहिती दिली. राहुल आणि असिन सध्या लग्नाच्या तयारीत असल्याचं असिनच्या मित्रांनी सांगितलं. असिन तिच्या करिअरमध्ये खूपच प्रोफेशनल राहिली आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ सरमिसळ केली नाही. त्यामुळेच ती सध्या आगामी ‘ऑल इज वेल’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. असिन सध्या ‘ऑल इज वेल’कडेच लक्ष देऊन आहे. त्यानंतरच लग्नाची तयारी करणार असल्याचा तिचा विचार आहे.