Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करण आहे फवादची ‘मेहबूबा’: अभिजित

Updated: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (10:09 IST)
 
भारतातून पाकिस्तानी कलाकारांना हाकलल्यानंतर ‘ये दिल है मुश्किल’ चित्रपटावर संक्रांत येण्याची शक्यता आहे. या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान आहे. त्याला चित्रपटातून वगळा अशी मागणी मनसेकडून होत आहे. मात्र चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असल्यामुळे त्याला वगळणे मुश्कील आहे. दरम्यान ‘कॉफी विथ करण’ हा टीव्ही शो पुन्हा सुरू होणार आहे. याचा पहिला भाग फवाद खान याला घेऊन करणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होती. मात्र करण जोहरने ही बातमी नाकारली आहे. कॉफी विथ करणमध्ये फवाद खान नसेल हे त्याने जाहीर केले आहे. या पाश्र्वभूमीवर अभिजित भट्टाचार्यने ट्विट करुन नवा वाद उकरुन काढला आहे. पुन्हा एकदा लव्ह जिहाद, मेहबूबा करण जोहर डिप्रेशनमध्ये पाकचा प्रियकर फवादने बिचार्‍या मिसेस करण जोहरला धोका दिला, अशा अर्थाचे टिट अभिजित भट्टाचार्यने केले आहे. 
 
अभिजितच्या या ट्विटचे पडसाद बॉलिवूड वतरुळात निश्चितच उमटणार असे दिसते. याला करण आणि धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित कलाकार कसे प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

वीकेंड ट्रिपसाठी पुण्याजवळील कमी प्रसिद्ध पण ५ सुंदर ठिकाणे

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

पुढील लेख
Show comments