मलायका करणार नाही दारु, सिगारेटची जाहिरात
एखाद्या प्रॉडक्टच्या जाहिरातीबद्दल बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. पण मलायका अरोरा म्हणते वादग्रस्त वस्तूंच्या जाहिराती ती करीतच नाही. दारु, सिगारेट आणि काळा रंग गोरा करणार्या प्रॉडक्टस्ची ती जाहिरात करत नाही कारण त्या फसव्या असतात.
जाहिरात स्वीकारण्यासाठी ती कोणता निकष वापरते असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना मलायका म्हणाली, ब्रँडला समजून घेणे खूप आवश्यक असते असे मला वाटते. मला जर सिगारेट आणि दारुची जाहिरात करायला सांगितली तर मी कधीच करणार नाही. माझ्या आयुष्याचा हा भाग नाही.
ती पुढे म्हणाली, रंग गोरा करणार्या क्रिमच्या बाबतीतही ही गोष्ट लागू होते. मला एखाद्या ब्रँडची जाहिरात करावी वाटली नाही तर मी कधीच करीत नाही.
