1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. सर्वात मोठ्या 'फॅन' सोबत शाहरुखचा सेल्फी!

सर्वात मोठ्या 'फॅन' सोबत शाहरुखचा सेल्फी!

shahrukh
बॉलीवूड बादशाह शाहरुख खान सध्या देशशत असहिष्णुतेच्या वादात 'फॅन'मुळे चर्चेत आहे. दोन टीजरनंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर लाँच केले आहे. 'फॅन'च्या नव्या पोस्टरमध्ये शाहरुखचा सर्वात मोठा फॅन गौरव त्याचा सेल्फी काढताना दिसत आहे. तो रुममध्ये बसलेला आणि भिंतीवर शाहरुखचा फोटो लावलेला आहे. गौरवच्या हातात एक ट्रॉफी दिसत आहे. शाहरुखचा या चित्रपटात डबल रोल आहे. एका भूमिकेत तो सुपरस्टार आर्यन खन्ना आणि दुसर्‍यात तो फॅन गौरवच्या भूमिकेत असेल. चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी याअगोदर बँड बाजा बरारचचे दिग्दर्शन केले होते.