शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 18 ऑक्टोबर 2015 (22:14 IST)

सोनमने दाखवला बोल्ड अवतार

sonam kapoor
बी-टाऊन अभिनेत्री सोनम कपूर सध्या गोव्यामध्ये सुटी एन्जॉय करत आहे. गर्ल गँगसोबत सोनम यावेळी गोव्यात आहे. येथील एक फोटो सोनमने चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आपल्या बिझी शेडय़ूलमधून काही दिवस वेळ काढून सोनम बहीण रिया कपूर आणि गर्ल गँगसोबत गोव्यात सुटी घालवण्यासाठी गेली आहे. या छायाचित्रांत सोनम खूपच बोल्ड दिसत आहे. शिवाय सोनमने फोटो शेअरिंग वेबसाइटवर स्वत:ची आणखी काही छायाचित्रे शेअर केली आहेत. सोनमचा आगामी सिनेमा ‘प्रेम रतन धन पायो’आहे, या सिनेमात ती सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा सिनेमा या वर्षी 12 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.