1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. ‘दृश्यम’ अरविंद केजरीवालांना भावला

‘दृश्यम’ अरविंद केजरीवालांना भावला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिग्दर्शक निशिकांत कामत यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच भावला आहे. 
 
कारण अजय देवगणची भूमिका असलेला ‘दृश्यम’ हा ‘मस्ट वॉच’ सिनेमा आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांनी ‘दृश्यम’ पाहिला. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर याबाबतची प्रतिक्रिया दिली. ‘दृश्यम’ पाहिला, जरूर पाहा, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे. 
 
‘दृश्यम’ या सिनेमाने पहिल्याच विकेंडमध्ये म्हणजेच अवघ्या तीन दिवसात तब्बल 30.03 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दृश्यम’ हा सिनेमा मल्ल्याळम, कन्नड, तेलुगू आणि तमिळनंतर मग हिंदीत बनला आहे. हिंदीत ‘दृश्यम’चं दिग्दर्शन मराठमोळ्या निशिकांत कामतने केलं आहे. 
 
या सिनेमाद्वारे अजय देवगणने एक भावनिक भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री तब्बू पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसते.