नीतिशतक निरूपण : सर्वांसाठी उपयुक्त ग्रंथ

neetishatak nirupan
Last Modified शनिवार, 21 मे 2022 (13:13 IST)
भारतीय वाङ्मयाच्या इतिहासात जसे कथा, आख्याने, व्याकरण ग्रंथ, उच्चारणशास्त्र ग्रंथ, तत्त्वज्ञान ग्रंथ यांचे स्थान आहे, त्याच प्रमाणे नीतिशास्त्राच्या ग्रंथांचे देखील महत्वपूर्ण असे स्थान आहे. नीतिशास्त्रीय वाङ्मयात विशेषत: माणसाने चांगले जीवन जगण्याकरिता “काय करावे आणि काय करू नये” या विषयी प्रतिपादन केलेले असते. प्राचीन भारतीय साहित्यात भर्तृहरिविरचित-नीतिशतकम्, कामंदकीय नीतिसार, कौटिल्याचे अर्थशास्त्र इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो.


भर्तृहरि हे एक यशस्वी राजे होते. त्यांच्या कालखंडाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. काही विद्वान त्यांचा काळ इसवी सन ७८ सांगतात. तर काही विद्वान त्यांचा कालखंड इसवी सन ५४४ सांगतात. त्यांनी नीतिशतकम्, वैराग्यशतकम्, शृंगारशतकम् अशी शतक काव्ये तसेच वाक्यपदीयम् हा शास्त्रीय ग्रन्थ यांची रचना केली आहे. असे उल्लेख मिळतात.

नीतिशतकम् या ग्रंथात त्यांनी १०० पेक्षा अधिक श्लोकांमधून सज्जनांची लक्षणे, मूर्खांची लक्षणे, विद्वानांची लक्षणे, कर्माचे महत्व, सत्कर्माचे महत्व, सुसंगतीचे महत्व इत्यादी विषयांवर उद्बोधक विचार मांडले आहेत. शिक्षक, विचारवंत, अभ्यासक, प्रवचनकार, कीर्तनकार आणि पालक अशा सर्वांसाठीच उपयुक्त असे हे श्लोक आहेत. यातील श्लोक, त्यांचे अर्थ आणि ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांचे निरूपण असा हा ग्रंथ निश्चितच संग्रहणीय आहे.
प्रस्तुत पुस्तक आधुनिक भारताचे शिल्पकार, आधुनिक भारतातील पहिले लोकनेते लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे.

या पुस्तकात नीतिशतकातील बहुतेक श्लोकांचा अर्थ आणि निरूपण देण्यात आले आहे. तसेच विचार शतक या शीर्षकाखाली १०० असे विचार जे वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यानंतर श्रीगुरू भगवानशास्त्रीमहाराज आणि डॉ. चंद्रहास शास्त्री यांच्या परिचयात्मक लेखांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील अतिशय चित्तवेधक अशा प्रकारचे आहे.
नीतिशतक निरूपण
डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर,
सहलेखन: सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर,
पृष्ठे: ११९
मूल्य: १८४ रु.
प्रकाशन: शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Health Tips: तुम्हीही रिकाम्या पोटी चहा पिता का? तर होऊ ...

Health Tips: तुम्हीही रिकाम्या पोटी चहा पिता का? तर होऊ शकतात हे नुकसान
दिवसाची सुरुवात जर गरम कप चहाने होत असेल तर यापेक्षा चांगले काहीही होणार नाही. अनेकांची ...

How to Boil Corn कॉर्न लवकर उकळण्यासाठी झटपट हॅक्स

How to Boil Corn कॉर्न लवकर उकळण्यासाठी झटपट हॅक्स
कॉर्न हे एक लोकप्रिय अन्न आहे जे भाजीपाला आणि संपूर्ण धान्य म्हणून खाल्ले जाते. सामान्यतः ...

Swami Vivekananda Quotes स्वामी विवेकानंदांचे विचार

Swami Vivekananda Quotes स्वामी विवेकानंदांचे विचार
एका वेळी एक गोष्ट करा, ते करताना तुमचा संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरून ...

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी हे ...

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
पावसाळ्यात केसांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते आणि स्वच्छतेचीही काळजी घ्यावी लागते. ...

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे, या प्रकारे सवय मोडा

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे, या प्रकारे सवय मोडा
सगळ्या वर्गातील लोकांना चहा पिण्याची सवय असते. सकाळपासून रात्रीपर्यंत बरेच लोक दिवसभरात ...