सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : सोमवार, 9 मे 2022 (17:09 IST)

बाळाचा पाळणा

लगबग नीज वेल्हाळा । लडिवाळा बाळा ।
 
अजुनि तुझ्या वाजत कां रुणझुणु हा बाळा ?
 
तान्हुल्या सानुल्या । राजसा पांखरा ।
 
किती रे असा खेळशील ? नीज ना वासरा ।
 
चंद्र , चांदण्या , काळ्याहि झोपल्या ।
 
पेंगुळली दुनिया ।
 
चिमण्या मोरा । जोजवू किती तुला ।
 
नीज नीज रे वेल्हाळा ।