शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By

८ व ९ नोव्हेंबर रोजी इंदुरात श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सव

येत्या ८ व ९ नोव्हेंबर रोजी इंदूर येथील वासुदेवराव लोखंडे मंगल भवन लोकमान्य नगर किशोर बाग रोड इंदूर येथे मध्य भारतातील एकमेव मराठी मासिक श्रीसर्वोत्तमचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या दिमाखदार सोहळ्यात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
यंदा श्रीसर्वोत्तम मासिकास २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ८ व ९ नोव्हेंबर रोजी स्नेहमेळावा घेण्यात येत आहे. ८ नोव्हेंबर रोजीच्या मेळाव्याच्या प्रथम सत्रात दुपारी दोन वाजता इंदूर येथील अभय माणके यांचा 'कीर्तन साहित्य रंग' हा कार्यक्रम तर पुण्याच्या वंदना धर्माधिकारी यांच्यातर्फे 'फक्त पत्त्यांची शाळा' हा कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी ५.३० वाजता लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी, ज्येष्ठ कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, साहित्यकार
व आनंदघनचे संपादक देविदास पोटे, भोपाळच्या मराठी साहित्य अकादमीचे निदेशक संतोष गोडबोले, नवी दिल्लीच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन, मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब तराणेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.
या प्रसंगी पद्मश्री मालती जोशी स्मृती कथा स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मध्य प्रदेशाचा शिखर सन्मान प्राप्त शास्त्रीय गायिका कल्पना झोकरकर, रंगकर्मी श्रीराम जोग, ऑस्करसाठी नामांकित हिंदी चित्रपट लापता लेडीजचे कलाकार विवेक सावरीकर यांचा सत्कार होणार आहे. 
 
तसेच ९ नोव्हेंबर रोजी पण अनेक दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन लिवा साहित्यिक सेवा समिती इंदूर, मराठी साहित्य अकादमी भोपाळ, श्री सर्वोत्तम मासिक इंदूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.