गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (14:54 IST)

मुक्त संवाद तर्फे इंदुरात म.प्र. मराठी साहित्य संमलेन आणि दिवाळी अंक व मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन

दिवाळीच्या रुचकर फराळानंतर सुशिक्षित व साहित्यप्रेमी लोकांसाठी आवश्यक घटक म्हणजे दिवाळी अंक. दिवाळी अंक हे मराठी साहित्याचे मानाचे पान आहे. 115 वर्षाची परंपरा असलेले जवळ जवळ 500 अंक मराठी माणसाची दिवाळी आनंददायी करतात. 
 
महाराष्ट्रात हे सहज उपलब्ध असले तरी इंदुरातील रसिक वाचक दीर्घ काळ दिवाळी अंकांच्या भेटी करता तळमळत होते. त्यांची ही ओढ लक्षात घेऊन मुक्त संवाद ने 14 वर्षांपूर्वी दिवाळी अंक प्रकाशनाच्या 100 व्या वर्षीचे निमित्त साधून दिवाळी अंक आणि ग्रंथ प्रदर्शन भरविण्यास सुरवात केली. अशात आपण सगळे साहित्यिक मेजवानी करता सादर आमंत्रित आहात. दरवर्षी प्रमाणे यंदा ही दिवाळी अंक आणि मराठी पुस्तक आणि ग्रंथ प्रदर्शन व विक्री प्रीतमलाल सभागृहात, महात्मा गांधी मार्ग इंदूर येथे दि. 8, 9 आणि 10 नोव्हेंबर 2024 दररोज सकाळी 11 ते सायं 6 वाजेर्पयंत आयोजित करण्यात येत आहे.
 
मुक्त संवाद साहित्यक समितीच्या ह्या उपक्रमाला सुरवातीपासून रसिक वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असला तरी गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणांमुळे लोकांचा पुस्तके वाचण्याकडे कल कमी झाला आहे. ई-बुक रीडिंग असो वा सक्रीन टाइममुळे वाचकांच्या हातातून पुस्तक हिसकावल्या गेल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाचकांची संख्या रोडावली आहे. तरी इतका उत्तम उपक्रम बंद पडू नये यासाठी मुक्त संवाद जीवाचे रान करत असते. ही वाचन संस्कृती टिकून राहावी ह्या करता रसिक वाचकांना असे आव्हान केले जात आहे की या प्रदर्शनात उत्साहाने सहभागी व्हावे.
वाचनाची आवड जोपासावी. आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी, तसेच आप्त स्वकीयांना एखादी महागडी कामास न येणारी भेटवस्तू देण्यापेक्षा दिवाळी अंक आणि ग्रंथ विकत भेट म्हणून द्यावे. ज्या योगे हा उपक्रम निरंतर राबवता येईल आणि आपली संस्कृती जपता येईल.

तसेच मुक्त संवाद साहित्यिक समिती इंदौरद्वारे 14 वें म.प्र. मराठी साहित्य संमलेनाचे आयोजन अभिनव कला समाज गांधी हॉल प्रांगण येथे आयोजित केले जात आहे. या अंतर्गत शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 रोजी नाट्यछटा व बालनाट्य कार्यशाळा कार्यक्रमात नाट्यछटा स्पर्था विजेत्यांची प्रस्तुती व पारितोषिक वितरण तर शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई येथील प्रा. विसुभाऊ बापट यांच्याद्वारे 'कुटुंब रंगलय काव्यात' सादर केले जाईल. तसेच रविवार, 10 नोव्हेंबर 2024 रोजी नागपुर येथील अमृतवक्ता श्री विवेक घळसासी यांचे 'सुखी जीवनासाठी संत साहित्य' या विषयावर व्याख्यान सादर केले जाणार आहे.
 
या उपक्रमास राज्य मराठी विकास संस्थे तर्फे बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना या अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त झाले आहेत. कार्यक्रमाची वेळ दररोज सायंकाळी 6.30 वाजेपासून असून कार्यक्रम स्थळ अभिनव कला समाज गांधी हॉल प्रांगण येथे आयोजित केले जात आहे.