सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2017-2018
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (14:51 IST)

विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – पंतप्रधान

देशातील शेतकरी, गरीब, दलित, छोटे उद्योजक, महिला आणि तरूण यांच्या विकासात गती देणारा अर्थसंकल्प सादर केला गेला. हा अर्थसंकल्प भ्रष्टाचार विरोधातील लढाईला बळ देणार आहे. खासगी गुणतवणुकीतही वाढ होऊन रोजगाराच्या संधी मिळतील. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात चांगल्या सुविधा उभारण्यास पोषण उपायोजना केल्या गेल्या आहेत. तर रेल्वेचे परिवहन सेवेतील योगदान अधिक भरीव करण्यासाठीही अर्थसंकल्पात महत्वपूर्ण तरतुदी केल्या गेल्या आहेत. हा अर्थसंकल्प म्हणजे आपली स्वप्न पूर्ण करणारा आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले. तसेच अर्थमंत्री अरूण जेटली व अर्थमंत्रालयाचे अभिनंदन केले.