1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (15:10 IST)

Career as online tutor :ऑनलाईन ट्यूटर म्हणून करिअर करा, कौशल्ये आणि पात्रता जाणून घ्या

गेल्या काही वर्षांत मुलांचा अभ्यास करण्याची पद्धत खूप बदलली आहे. जरी भारतात ऑनलाइन शिकवणी बऱ्याचकाळापासून लोकप्रिय आहे, परंतु कोरोनाच्या काळात त्याला खूप चालना मिळाली आहे. अनेक दिवसांपासून शाळा बंद असून मुले घरबसल्या ऑनलाइन शिक्षण घेत होते. इतकेच नाही तर आता शिकवणी ही  ऑनलाइन होऊ लागल्या आहेत. अलीकडच्या काळात ऑनलाइन ट्युटर संगणकाच्या साहाय्याने इतर राज्यातून किंवा इतर देशांतील मुलांना शिकवत आहे . पण आताच्या वातावरणात  बहुतेक घरांमध्ये पालक फक्त ऑनलाइन शिकवणीला महत्व देत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधी खूप वाढल्या आहेत.या क्षेत्रात करिअर कसे करू शकता जाणून घ्या.
 
कामाचा स्वरूप -
ऑनलाइन ट्युटोरिंग ही खरे तर होम ट्युटोरिंगची प्रगत पद्धत असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये मुलांना ई-ट्यूटरिंगद्वारे शिकवले जाते. ऑनलाइन शिकवणीचा मूलभूत फायदा असा आहे की शिक्षक विद्यार्थ्याला कोणत्याही ठिकाणाहून, अगदी त्याच्या घरूनही शिकवू शकतात. ऑनलाइन शिकवणी करताना, वेळेची अगोदर खात्री केली जाते आणि नंतर विद्यार्थी आणि शिक्षक ऑनलाइन वर्गात भेटतात आणि अभ्यास करतात आणि शिकवणी घेतात. या कामा ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअरनुसार निवड करू शकता. याशिवाय त्यातून उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळतो.
 
पात्रता
करिअर तज्ञांच्या मते, ऑनलाइन ट्यूटरकडे कौशल्यावर आधारित पात्रता असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट भाषेचे ऑनलाइन ट्यूटर बनायचे असेल, तर तुम्ही त्या भाषेशी संबंधित किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. याशिवाय बीएड, एम.एड किंवा नेट इत्यादी नंतर तुम्ही अध्यापनाचे क्षेत्रही निवडू शकता. 
 
वैयक्तिक कौशल्ये
ऑनलाइन ट्यूटर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे अभ्यासाची आवड. म्हणजेच तुम्हाला फक्त इतरांना शिकवायलाच आवडते असे नाही तर तुम्हाला स्वतःला नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असायला हवी. तुम्ही ऑनलाइन शिकवत असल्याने तुमच्याकडे तांत्रिक कौशल्येही असली पाहिजेत. उदाहरणार्थ, कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या वापरासोबत मुलांनी प्रेझेंटेशन वगैरे करायलाही यायला हवे. याशिवाय ऑनलाइन शिकवताना तुमचे संवाद कौशल्यही खूप महत्त्वाचे असते. लक्षात ठेवा की इतरांना शिकवणे हे एक गंभीर काम आहे आणि त्यासाठी वचनबद्धता आवश्यक आहे.
 
ऑनलाइन ट्यूटर कसे बनाल-
ऑनलाइन ट्यूटर बनण्यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाही. तुम्ही आत्तापर्यंत शिकवणी घेत असाल, तर आता त्याच मुलांना ऑनलाइन शिकवायला सुरुवात करू शकता. याशिवाय अनेक कंपन्या आणि वेबसाइट्स आहेत ज्या ऑनलाईन शिक्षकांची नियुक्ती आणि ऑनलाइन शिकवण्याची संधी देतात. अशा परिस्थितीत तुम्हाला ऑनलाइन विद्यार्थी शोधण्याचीही गरज नाही. या कंपन्यांमध्ये सहभागी होऊन तुम्ही चांगले करिअर करू शकता.
 
पगार -
ऑनलाइन ट्यूशन हे एक क्षेत्र आहे जिथे अनुभवी शिक्षक भरपूर कमाई करू शकतात. सुरुवातीला एक अनुभवी शिक्षक सुमारे 500 रुपये प्रति तास आकारू शकतो. त्याच वेळी, काही काळाच्या जम बसल्यावर, तुम्हाला प्रति तास 1000 रुपये मिळू शकतात. जर तुम्ही या क्षेत्रात तुमची गुणवत्ता सिद्ध केली आणि विद्यार्थ्यांना तुमची शिकवण्याची पद्धत आवडली तर तुमच्या कमाईला कोणतीही मर्यादा नाही.