शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:07 IST)

Career in PHD Journalism and Mass Communication : पीएचडी जर्नलिज्म अँड मास कम्युनिकेशन मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती जाणून घ्या

डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन जर्नलिज्म अँड मास कम्युनिकेशन हा 3 वर्षाचा कालावधीचा डॉक्टरेट स्तरावरील पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. या कोर्सचा मुख्य उद्धेश्य  संशोधन किंवा अध्यापन व्यवसायात प्रवेश करणे आहे. पीएचडी जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन कोर्सचे मुख्य विषय म्हणजे जाहिरात सिद्धांत, संस्कृती आणि माध्यमांचा सिद्धांत, संशोधन कार्यपद्धती, संवादाची नीतिशास्त्रचा अभ्यास केला जातो. 
पात्रता निकष -
*  इच्छुक उमेदवाराकडे पत्रकारिता आणि जनसंवाद किंवा त्याच्याशी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदवी असणे आवश्यक आहे. 
* पीएचडी फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण असणे आवश्यक आहे
* यासोबतच, उमेदवाराला विद्यापीठाकडूनच किंवा UGC-NET सारख्या राष्ट्रीय परीक्षांद्वारे आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या दर्जापर्यंत गुण मिळवावे लागतात. 
 
 प्रवेश प्रक्रिया -
कोणत्याही टॉप युनिव्हर्सिटी मध्ये पीएचडी पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमात विषयात  प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षेला बसणे आवश्यक आहे. 
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, वैयक्तिक मुलाखत असते आणि जर उमेदवारांनी त्यात चांगले गुण मिळवले तर त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.
 
अर्ज प्रक्रिया -
 * उमेदवारने अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 
* अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, अर्ज भरा. 
*  अर्ज भरल्यानंतर, फॉर्ममध्ये काही चूक असल्यास योग्यरित्या तपासा, अन्यथा तो नाकारला जाऊ शकतो. 
*  मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. 
 * अर्ज सबमिट करा. 
* क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फॉर्मची फी भरा.. 
 
प्रवेश कसे मिळवायचे - 
*  उमेदवारांनी पीएचडी पत्रकारिता आणि जनसंवादात प्रवेश घेण्यासाठी सर्वोच्च विद्यापीठाचे लक्ष्य ठेवले असेल, तर त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते आणि नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशपत्र जारी केले जातात. ज्यामध्ये प्रवेश परीक्षेशी संबंधित सर्व माहिती दिली जाते जसे की परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे, इत्यादी.
  पत्रकारिता आणि जनसंवादसाठी प्रवेश प्रक्रियाUGC CSIR NET, UGC , BHU ,AMU  इत्यादी प्रवेश परीक्षेवर अवलंबून असते. पात्र उमेदवारांची पुढील मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते.
 
प्रवेश परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी त्याचा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार महाविद्यालये दिली जातात.
 
* मुलाखत आणि नावनोंदणी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाते 
  विद्यार्थ्यांना एकतर ऑनलाइन (स्काईप, गुगल मीट, झूम) किंवा ऑफलाइन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बोलावले जाते.
 
या दरम्यान, इतर सर्व पात्रता निकष तपासले जातात आणि जर विद्यार्थ्यांनी मुलाखतीत चांगली कामगिरी केली तर त्यांना डॉक्टरेट स्तरावर पत्रकारिता आणि जनसंवादाताचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
 
अभ्यासक्रम-
रिसर्च मैथेडलॉजी 1 
रिसर्च मैथेडलॉजी 2 
कम्युनिकेशन थ्योरी 
रिसर्च राइटिंग अँड एथिक्स
 जर्नलिज्म स्टडिज 
स्पेशलाइज्ड अँड एनालिटिक्ल जर्नलिज्म एडवरटाइजिंग अँड पब्लिक रिलेशन रिसर्च एनालाइजिंग मीडिया, मैसेज अँड  ऑडियंस इश्यू इन मीडिया इकोनॉमी कम्युनिकेशन अँड डेवलेपमेंट इश्यू हिंदी सिनेमा स्टडीज मीडिया, यूथ अँड पार्टिसिपेटरी गवर्नमेंट
 
शीर्ष महाविद्यालये -
अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय- 
 एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा
आंध्र विश्वविद्यालय, विशाखापत्तनम
 लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी, जालंधर
 मद्रास विश्वविद्यालय, चेन्नई
 मैसूर विश्वविद्यालय, मैसूर
 भारथिअर विश्वविद्यालय, कोयंबटूर
 
  जॉब व्याप्ती  -
जर्नलिस्ट
 राइटर
 इवेंट मैनेजर
 प्रोफेसर