NEET PG 2021 Registration, 15 मार्च पर्यंत या प्रकारे करा अप्लाय
NEET PG 2021 Registrations: नेशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशनने नीट पीजी 2021 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. नीट पीजीसाठी रजिस्ट्रेशन आजपासून अर्थात 23 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. इच्छुक अभ्यर्थी NBE च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर ऑनलाइन अर्ज करु शकतं. एनबीएई नीट पीजी 2021 चं एप्लीकेशन फॉर्म nbe.edu.in वर असून फॉर्म भरण्यासाठी लिंक पेज आहे. नीट पीजी 2021 साठी रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.
नीट पीजी 2021 परीक्षेसाठी अर्ज कसे करावे?
नीट पीजी 2021 परीक्षेसाठी NBE च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जावं लागेल. वेबसाइटवर आपल्याला नीट पीजी 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंक मिळेल. येथे अर्ज करायचे आहे.
केव्हा आहे नीट पीजी 2021 परीक्षा?
नेशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशनने नोटिफिकेशन जाहीर केले आहे की नीट पीजी 2021 ची परीक्षा 18 एप्रिल 2021 रोज होईल. नीट पीजी 2021 च्या परीक्षेचं परिणाम 31 मे 2021 ला जाहीर केला जाईल.
कसे डाउनलोड करावे एडमिट कार्ड?
NBE च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवारांद्वारे नीट पीजी प्रवेश पत्र/ए़डमिट कार्ड 2021 डाउनलोड केलं जाऊ शकतं. नीट पीजी 2021 एडमिट कार्ड डाउनलोड करण्याची लिंक देखील आपल्याला nbe.edu.in वेबसाइटवर मिळेल. यासाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले जाईल. नीट पीजी 2021 एडमिट कार्डला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर डाउनलोड पर्याय दिसेल. हे आपल्याला परीक्षा केंद्रावर सोबत घेऊन जावं लागेल.
नीट पीजी परीक्षा 2021 बद्दल
नीट पीजी परीक्षा 2021 देशभरात 162 शहरांमध्ये कॉम्प्युटर आधारित मोडमध्ये आयोजित केली जाणार. नीट पीजी 2021 मध्ये 300 एकाधिक निवड प्रश्नांसह संगणक आधारित परीक्षा असेल. यासाठी आपल्यालाकडे 3 तास 30 मिनिटाचा कालावधी असेल. परीक्षा दरवर्षी मास्टर ऑफ सर्जरी (एमएस) च्या 10,821, डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) च्या 19,953, पीजी डिप्लोमा सीट्ससाठी 1,979 आणि 6,102 सरकारी आणि खाजगी डीम्ड, केंद्रीय यूनिवर्सिटी मध्ये प्रवेश दिला जातो. संपूर्ण देशभरातील कॉलेजमध्ये नीट पीजी प्रवेशासाठी एकूण 48000 सीट्स आहे. प्रत्येक वर्षी नीट पीजीसाठी एक लाखाहून अधिक उमेदवार अर्ज करतात. मागील वर्षी एकूण 1,67,102 नीट पीजीसाठी अर्ज भरले गेले होते.
नीट पीजी परीक्षेत कोण सामील होऊ शकतात?
उल्लेखनीय आहे की नीट पीजी परीक्षेत केवळ तेच भाग घेऊ शकतात ज्यांच्याकडे एमबीबीएस ची डिग्री असेल किंवा मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाहून मान्यताप्राप्त प्रोव्हिजनल एमबीबीएस पास सर्टिफिकेट असेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट https://exam.natboard.edu.in/communication. वर माहिती मिळू शकते.