FYJC 11th Admission : अकरावी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

school
Last Modified शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (09:36 IST)
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. 11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.

सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. वरील पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.

अशी असेल ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :
14 ते 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्ज भाग - 1 भरता येईल.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाची पडताळणी करण्यासाठी जवळच्या कॉलेज किंवा मार्गदर्शक केंद्रावर जाता येईल.
17 ऑगस्ट सकळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरता येईल.
यात विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी पसंती प्राधान्यानुसार द्यायची आहेत.
विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती देण्यात येईल.
23 ऑगस्ट सकाळी 10 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधरण गुणवत्ता यादी ( मेरीट लीस्ट) जाहीर होणार.
प्रवेश अर्जात काही बदल करायचे असल्यास संधी दिली जाणार आहे.
27 ऑगस्ट सकळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार
पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होणार.
27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहे.
30 ऑगस्ट रात्री 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. 11वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते.
न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 14 ऑगस्ट 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे.
प्रवेशाकरिता https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन मोबाईल अॅप डाऊनलोड करता येऊ शकेल. तसंच अधिक माहितीसाठी [email protected] या मेल आयडीवर संपर्क साधावा.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

मंकीपॉक्स रोगाची गंभीर लक्षणे

मंकीपॉक्स रोगाची गंभीर लक्षणे
मंकीपॉक्स इंग्रजीत:कोरोनाची प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता आणखी एक विषाणू समोर ...

गुडघ्यांची काळजी घेण्यासाठी आणि वृद्धापकाळात सांधेदुखीपासून ...

गुडघ्यांची काळजी घेण्यासाठी आणि वृद्धापकाळात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी ही योगासने करा
गुडघेदुखी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते आणि ही एक सामान्य तक्रार आहे. त्यामुळे, ...

नात्यात काही नवीन करा, प्रेम वाढेल

नात्यात काही नवीन करा, प्रेम वाढेल
प्रेमात जोडीदाराला सरप्राईज देणे, क्वालिटी टाइम घालवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. ...

Eye liner काढण्यासाठी पाणी नव्हे हे वापरा

Eye liner काढण्यासाठी पाणी नव्हे हे वापरा
Eye liner डोळ्यांवर आय लायनर लावणे हा महिलांच्या मेकअपचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही ...

Career Tips : पायलट कसे व्हावे: पायलट होण्यासाठी खर्च, ...

Career Tips : पायलट कसे व्हावे: पायलट होण्यासाठी खर्च, कोर्स, कालावधी आणि पात्रता जाणून घ्या
प्रत्येकाचं स्वप्नं असत की त्याने आकाशात उडावे. हे स्वप्नं पूर्ण करण्याचे 2 मार्ग आहे. ...