गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (13:22 IST)

MHT CET 2021 ची नोंदणी पुन्हा सुरु जाणून घ्या कसा कराल अर्ज

राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. 
 
तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी 2021 या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यानी अजूनही ऑनलाइन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी दिनांक 12/08/2021 ते दिनांक 16/08/2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. तसेच या पूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी दिनांक 14/08/2021 ते 16/08/2021 या कालावधील संधी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी  http://mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
 
या प्रकारे करा अर्ज 
MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यानी mhtcet2021.mahacet.org. या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 
त्यासाठी MHT CET 2021 registration या नावावर क्लिक करा
 
त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती काळजीपूर्वक भरा आणि सेव्ह बटन वर क्लिक करा.
 
MHT CET 2021 application form भरण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
 
नंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन स्वरुपात भरा आणि सबमीट या बटणावर क्लिक करा.
 
तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून शकता.