मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified सोमवार, 28 जून 2021 (20:04 IST)

फॅशन डिझायनिंग मध्ये करिअर बनवा

फॅशन डिझायनिंग हा एक व्यावहारिक कलेचा एक प्रकार आहे जो आपल्या कपड्यांना, वस्तू आणि जीवनशैलीला सौंदर्य देतो.फॅशन डिझायनिंगमध्ये कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत आणि पर्सपासून शूजपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.
 
डिझायनरला ग्राहक वर्गाची आवड आणि आवश्यकता समजून आणि हंगाम आणि ट्रेंडनुसार त्याचे डिझाइन बाजारात आणावे लागते.फॅशन जगात आज डिझाइनर्सना मोठी मागणी आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये सर्जनशीलतेची मागणी असते
 
फॅशन चा अर्थ नवीन डिझाईन केलेले कपडेच नव्हे तर त्याला परिधान करण्याची पद्धत पासून त्यात लागणारे साहित्य देखील फॅशन डिझाईनिंग च्या क्षेत्रात येतात.सध्याच्या काळात फॅशन डिझायनिंग हा सर्वात ग्लॅमर व्यावसाय आहे म्हणून फॅशन डिझायनिंगमध्ये करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
 
 
एक प्रशिक्षित फॅशन डिझायनर या उद्योगाच्या विविध क्षेत्रात डिझाइन वियर उत्पादन, फॅशन मार्केटिंग, क्वालिटी कंट्रोल इत्यादींमध्ये कार्य करू शकतो.याशिवाय कॉस्ट्यूम डिझायनर,पर्सनल स्टायलिस्ट,फॅशन को-ऑर्डिनेटर, फॅब्रिक बायर या क्षेत्रातही काम करता येत. 
 
हा कोर्स करून स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो.जसे की फॅशन शो ऑर्गनायझर,गारमेंट स्टोअर चेन,बुटीक, ज्वेलरी हाऊस इत्यादी.
 
कम्युनिकेशन कौशल्य चांगले असावे.गेल्या 10 वर्षात या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत.वार्षिक फॅशन वीक मुंबई आणि दिल्लीत आयोजित केले जातात.या मध्ये नामांकित फॅशन डिझाइनर व्यतिरिक्त नवोदित फॅशन डिझायनर्स ला आपल्या प्रतिभेला दाखविण्याची संधी मिळते.आपल्याला या क्षेत्रात कलात्मक असणे आवश्यक आहे.
 
या सह आपल्याला नवीन डिझाईन देण्यासाठी सतत मेहनत आणि संशोधन करावे लागते.आपण एखाद्या संकल्पनेवर काम करत असाल तर हे लक्षात घेतले पाहिजे की या पूर्वी आपण वापरलेली रचना इतर कोणत्याही डिझाइनर ने तयार केलेली नसावी.