1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (19:47 IST)

आरोग्य सेवेत करिअर करण्याची संधी

Opportunity
करिअर घडवणाच्या दृष्टीकोनातून देशातील आरोग्य सेवेच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करता येणे शक्य नाही.या क्षेत्रात वाढ होणं संभाव्य आहे.याचे मूळ कारण म्हणजे वैद्यकीय टुरिझम पासून मिळणारे उत्पन्न आणि खासगी रुग्णालयांचे वाढते वर्चस्व.सध्या शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधेच्या होणाऱ्या दुर्दशा मुळे आणि रुग्णालयातील डॉक्टरांच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेच्या व्यवहारामुळे सर्वसामान्य माणसांना खासगी डॉक्टरांचा धावा घ्यावा लागतो.
 
सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे की येणाऱ्या काही दशकात देशात खासगी गुंतवणूक आणि कार्पोरेट रुग्णालयाच्या संस्कृतीमुळे उपलब्ध बेड्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल.एवढेच नव्हे तर अत्याधुनिक डायग्नोस्टिक उपकरणांवर देखील अधिक पैसे खर्च केले जातील.आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयांचे प्रमाण अधिक वाढतील.
 
या खाजगी रुग्णालयात अपोलो,मॅक्स,मेदांता समूह,मेट्रो हॉस्पिटल,इत्यादींची नावे विशेषतः घेतले जातात.महानगरांच्या पलीकडे जाऊन हे ग्रुप आता लहान शहरांमध्ये देखील रुग्णालय उघडत आहे.त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करण्याची संधी मिळत आहे.
 
म्हणण्यासाठी सरकारी रुग्णालयांचे आधुनिकीकरण केले जात आहे परंतु हे मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित आहे.याचे मुख्य कारण म्हणजे सरकारकडे पुरेसे पैसे असणे आणि इतर गोष्टीना प्राधान्यता देणे.असे असून देखील या सरकारी आरोग्य केंद्रामध्ये काम करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांची सर्वात जास्त संख्या आहे.  
या क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारींना अनेक फायदे मिळतात.
 
भविष्यात या क्षेत्रात आधुनिक वैद्यकीय उपकरण चालवणारे प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि नवीन रोगांच्या नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षित डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात येईल यात काहीच संशय नाही.ही वस्तुस्थिती नाकारली जाऊ शकत नाही.