रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (20:58 IST)

सीबीएसई निकाला बाबत असमाधानी विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये परीक्षा देण्याची संधी -शिक्षण मंत्री निशंक

सीबीएसई दहावी बारावी परीक्षेचा निकाल 2021 केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी शुक्रवारी सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की कोणत्याही विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर कोणताही अन्याय होणार नाही.

ते म्हणाले की सीबीएसईच्या मूल्यांकन पध्दतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार निकाल मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना सीबीएसई मूल्यांकन पद्धतीचा निकालावर  असमाधानी असेल त्यांना परिस्थिती योग्य असेल तेव्हा परीक्षेत उपस्थित राहण्याचा पर्याय ही असेल. ही पर्यायी परीक्षा ऑगस्टमध्ये होऊ शकते.
 
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या आपल्या संदेशात ते म्हणाले, 'विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधानांचे कृतज्ञ आहे.सीबीएसईच्या प्रस्तावानुसार त्याने आपला निर्णय दिला याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे आभारी आहे.
 
 
विशेष म्हणजे सीबीएसई 12 वीच्या निकालाच्या सूत्रावर बरेच विद्यार्थी आणि पालक संतप्त आहेत. दहावीच्या गुणांना बारावी निकालाचा आधार बनवू नये असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दहावीच्या गुणांचा 12 व्या कामगिरीवर परिणाम होत नाही. काही विद्यार्थ्यांनी असेही म्हटले आहे की 11 वी मधील नवीन विषयामुळे त्यांना समजण्यास बराच वेळ लागतो.11 वीत विद्यार्थी एवढा गंभीर नसतो तर बारावीत अकरावीच्या गुणांना समाविष्ट करणे चुकीचे आहे.
 
1 जून रोजी सीबीएसई 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. 18 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बोर्ड निकालाचा फॉर्म्युला स्वीकारला होता. सूत्रानुसार सीबीएसई 12 वीचा निकाल दहावी, अकरावी आणि बारावीतील कामगिरीच्या आधारे जाहीर केला जाईल. दहावी आणि अकरावीच्या गुणांना 30-30 टक्के वेटेज आणि 12 वीच्या कामगिरीला 40 टक्के वेटेज देण्यात येणार आहेत. 
 
सीबीएसई 12 वी चा निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर होईल. जे मुले निकालावर समाधानी नाहीत त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परीक्षेस बसण्याची संधी दिली जाईल. कोर्टाने केंद्र सरकारने सादर केलेले बारावी निकालाचे फॉर्म्युले  मान्य केले. इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट 3 पेपरचे गुण घेतले जातील. अकरावीच्या सर्व थ्योरी च्या पेपर्सचे गुण घेतले जातील. त्याचबरोबर, इयत्ता 12 वी मध्ये विद्यार्थ्यांची युनिट,टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षेचे गुण घेतले जातील . 

 
सीबीएसई 12 वी च्या निकालाचा फॉर्म्युला समजून घ्या -
12 वी वर्ग - गुण युनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री-बोर्ड परीक्षेच्या कामगिरीच्या आधारे दिले जातील. त्याचे वेटेज 40 टक्के असेल.
इयत्ता 11 वी - अंतिम परीक्षेत सर्व विषयांच्या थ्योरीच्या पेपरच्या कामगिरीच्या आधारे गुण देण्यात येतील. त्याचे वेटेज 30 टक्के असेल.
इयत्ता दहावी - मुख्य  विषयांपैकी तीन विषयांचे थ्योरी पेपरच्या कामगिरीच्या आधारे गुण देण्यात येतील. पाच पैकी तीन विषय असे असतील ज्यात विद्यार्थ्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याचे वेटेज ही 30 टक्के असतील.