गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (18:59 IST)

काय सांगता,बँकेत गेलेल्या ग्राहकावर गोळी झाडली

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मास्क लावणे,सामाजिक अंतर राहणे आणि वारंवार हात धुण्याच्या सल्ला देण्यात आला आहे.कोरोनाची दुसरी लाट आता मंदावली आहे आणि अनेक राज्यात कोरोनासाठी लावलेले निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहेत. त्या मुळे लोकांना लॉक डाऊन पासून मुक्तता मिळाल्यामुळे काही लोक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसताना दिसतात.ते विना मास्कचे फिरतात त्यामुळे त्यांना दंड आकारावा लागत आहे.तरी ही लोक पालन करत नाही.आज मास्क न घातल्यामुळे चक्क एका माणसांवर गोळ्या घालण्यात आला.ही घटना आज प्रत्यक्षात बरेली येथे घडलेली आहे.  
 
ही घटना आहे बरेली इथल्या बँक ऑफ बडोदाची इथे बँकेत एका ग्राहकाला बँकेच्या गार्डाने मास्क न लावून आल्यामुळे चक्क त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
 
प्रकरण असे आहे की बरेली जंक्शनजवळील नॉर्थ रेल्वे कॉलनीतील रहिवासी राजेश कुमार राठोड वय वर्ष 35 हे टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये हेल्परच्या पदावर आहे.सकाळी सिव्हिल लाईन्स येथील बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयात गेले .त्यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता.या गोष्टीवरून त्यांचे वाद बँकेत गार्ड पदावर असलेल्या केशव प्रसाद मिश्रा याच्याशी झाले. 
 
बरेलीचे पोलिस अधीक्षक (शहर) रवींद्र कुमार यांनी सांगितले की, ग्राहक राजेश कुमार शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता बँकेत पोहोचले आणि केशव प्रसाद मिश्रा या बँक शाखेच्या आवारात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांशी वाद घालू लागले.
 
या वादाला इतके गंभीर वळण लागले की गार्ड मिश्राने चक्क राजेश कुमार यांच्या वर गोळी झाडली आणि ती गोळी राजेश यांच्या पायाला लागून ते जखमी झाले. राजेश यांना त्वरित बरेली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
 
शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक गीता भुसाळ यांनी सांगितले की,फॉरेन्सिक टीम सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच घटनेबद्दल काही कळेल. बँकेत गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक (बरेली झोन) रमित शर्मा, वरिष्ठ पोलिस अधीक्षक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.गार्ड केशव कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.