गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (17:30 IST)

एडवरटाइजिंगच्या दुनियेत करिअर बनवा

एडवरटाइजमेण्ट एक असे साधन आहे,ज्याद्वारे एखाद्या उत्पादनाची माहिती देण्यासह त्याची प्रसिद्धी केली जाते.जाहिरातीद्वारे लोकांना केवळ त्या उत्पादनांची वैशिष्ट्येच सांगितली जात नाहीत तर त्याचा वापर करण्याची गरजही त्या संदेशात सांगितली जाते.  
 
जाहिरातीची पहिली आवश्यकता आहे की उत्पादनांची खरेदीदारास पुरेशी माहिती असावी.तसेच जाहिरातीमुळे त्याचे मन उत्पादन घेण्यास तयार होऊ शकेल.या साठी मीडियाचा वापर केला जातो.टीव्ही चॅनल,वर्तमानपत्रे, इंटरनेट,मासिके, रेडिओ,होर्डिंग्स,बिल बोर्ड,ही सर्व जाहिरात करण्याची मुख्य माध्यम आहे.
 
जाहिरात हे एक असे साधन आहे ज्याद्वारे एखाद्या उत्पादनाची माहिती देण्यासह त्याची प्रसिद्धी केली जाते.जाहिरातीद्वारे लोकांना केवळ त्या उत्पादनांची वैशिष्ट्येच सांगितली जात नाहीत तर त्याचा वापर करण्याची गरजही त्या संदेशात सांगितली जाते.   
 
जर आपण सर्जनशील आहात आणि आपल्या कल्पना सहजपणे पेनाने कागदावर ठेवू शकता तर मग हे क्षेत्र आपल्यासाठीच आहे.जाहिरातींनी ब्रँड इमेज तयार केली जाते.यात कम्युनिकेशन ची भूमिका महत्त्वाची आहे.आपण एखाद्या उत्पादनांबद्दल लोकांना कश्या पद्धतीने सांगता,हे महत्त्वपूर्ण आहे.
 
 
जाहिरातीमध्ये ग्लॅमर असते, परंतु त्याच बरोबर पावलोपावले त्यात आव्हाहन देखील आहे.दिवेसंदिवस नवीन नवीन एड एजेन्सी उघडत आहे.सर्वांकडे आपापल्या कल्पना आहे,म्हणून या क्षेत्रात स्पर्धा खूप मजबूत आहे.आपल्याला या क्षेत्रात आपले कौशल्य आणि आपली योग्यता दाखवून द्यावी लागणार.
 
पात्रता- बऱ्याच जाहिराती संस्था औपचारिक मॅनेजमेंट डिग्री किंवा मास कम्युनिकेशनच्या पदवीधारकांना संधी देते. या व्यतिरिक्त आपले संवाद कौशल्य किंवा कम्युनिकेशन कौशल्य चांगले मजबूत असावे.आपल्याला आपले कौशल्य आणि सर्जनशीलता वेगवेगळ्या पद्धतीने वापरण्याची कला देखील माहिती असावी.पदवीहून जास्त महत्वाचे सर्जनशील लिखाण असणे आवश्यक आहे.
 
अभ्यासक्रम- जवळजवळ प्रत्येक विद्यापीठात मास कम्युनिकेशन आणि  एडवरटाइजिंग अभ्यास क्रम उपलब्ध आहे.