शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: स्टॉकहोम , मंगळवार, 22 जून 2021 (14:47 IST)

कोरोना लसींचे दोन भिन्न डोस प्रभावी : जागतिक आरोग्य संघटन

कोरोना लसीची परिणामकता आणखी प्रभावी करण्यासाठी, लस तुटवड्यावर मात करण्यासाठी दोन भिन्न कंपन्यांच्या लसी देण्याबाबत विचार सुरू असतानाच दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी दिल्यानंतरही लसी प्रभावी ठरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी लसीची प्रतीक्षा करणार्या  देशांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले की, लसीकरण मोहिमेत दुसर्यान कंपनीचा डोस देता येऊ शकतो. याआधी काही शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या व्हेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कंपनंची लस देण्याची सूचना केली होती. यामुळे व्हेरिएंटचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.