शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : सोमवार, 21 जून 2021 (09:19 IST)

जागतिक योग दिवस 2021 विशेष : योगाचा संपूर्ण इतिहास जाणून घ्या

योगाच्या अभ्यासाच्या इतिहासाला आपण दोन भागात विभागू शकतो.प्रथम हिंदू परंपरेमधून मिळालेला इतिहास आणि दुसरा संशोधनावर आधारित इतिहास.योगाचा इतिहास खूप मोठा आहे.इथे आम्ही आपल्याला थोडक्यात माहिती देत आहोत. 
 
असे म्हटले जाते की जवळपास 15 हजार वर्षांपासून योगासना सतत भारतात चालू आहे. सभ्यतेच्या युगाआधीही ऋषीमुनींनी प्राणी आणि पक्ष्यांना बघून योगाची मुद्रा विकसित केली आणि मग अशा प्रकारे योगात अनेक आयाम जोडले गेले.
 
हिंदू परंपरेवर आधारित योगाचा इतिहास-
 
1 योगाचा उपदेश प्रथम हिरण्यगर्भ ब्रह्मा यांनी सनकदिकांना, नंतर विवस्वान सूर्या, रुद्रादी ला दिला.नंतर हे दोन शाखेत विभागले गेले.एक ब्रह्मयोग आणि दुसरे कर्मयोग.
 
2 ब्रह्मयोगाची परंपरा सनक, सनंदन,सनातन,सनत्कुमार,कपिल,आसुरी, वोढू,पंचशीख नारद आणि शुकादिकांनी सुरू केली.हा ब्रह्मयोग लोकांमध्ये ज्ञान योग,अध्यात्मयोग आणि सांख्ययोग म्हणून प्रसिद्ध झाला. 
 
3 कर्मयोगाची दुसरी परंपरा म्हणजे विवस्वानाची आहे.विवस्वानाने वैवस्वत मनुला,मनूने ऋषभदेव आणि इक्ष्वाकु यांना इक्ष्वाकुंनी राजर्षी आणि प्रजेला योगाचा उपदेश दिला.नंतर प्रभू श्रीराम यांना ऋषी वशिष्ठ आणि ऋषी विश्वामित्रांनी हे ज्ञान दिले.
 
4 परंपरेतून मिळालेलं हे ज्ञान महर्षी सांदिपनी,वेदव्यास, गर्गमुनि,घोर अंगिरस,नेमिनाथ इत्यादी गुरूंनी भगवान श्रीकृष्णांना दिले आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिले.
 
5 योगाचे हे ज्ञान नंतर भगवान महावीर स्वामी यांनी पंच महाव्रत आणि गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्गाच्या नावाने वाढविले.
 
6  परंपरेतूनच या ज्ञानाचा प्रसार महर्षि पतंजली यांनी योगसूत्रमार्फत केला होता आणि आदि शंकराचार्य यांनी वेदान्ताच्या माध्यमाने याचा प्रसार केला होता.
 
7 हे ज्ञान नंतर हठ योगाच्या नावाने  84 नाथांच्या परंपरेने पुढे गेले,ज्यांचे मुख्य योगी गुरु मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरख नाथ किंवा गोरक्षनाथ होते.
 
8 शैव परंपरेनुसार योगाची सुरुवात आदिदेव शिवापासून होते. शिवने योगाचे पहिले शिक्षण पत्नी पार्वती यांना दिले.
 
9 भगवान शिवने आपले दुसरे शिक्षण केदारनाथमधील कांती सरोवरच्या काठी आपल्या पहिल्या 7 शिष्यांना दिले, ज्यांना सप्तर्षी म्हणतात.
 
10 भगवान शिवची योग परंपरा त्यांचे शिष्य बृहस्पति, विशालाक्ष शिव, शुक्र,सहस्राक्ष, महेन्द्र,प्राचेतस मनु, भारद्वाज, अगस्त्य मुनि, गौरशिरीष मुनि,नंदी,कार्तिकेय, भैरवनाथ इत्यादींनी पुढे आणले.
 
11  भगवान शिव नंतर गुरु दत्तात्रेय योगाचे सर्वश्रेष्ठ गुरु होते.गुरु दत्तात्रेयांच्या योग परंपरेत पुढे मग आदी शंकराचार्य आणि गोरक्षनाथांच्या परंपरेची सुरुवात होते.
 
12 गुरु गोरक्षनाथांच्या 84 सिद्ध आणि नवनाथांच्या परंपरेनुसार, मध्ययुगीन काळात योगासने पुढे नेणारे बरेच मोठे संत होते. संत गोगादेवजी,रामसापीर,संत ज्ञानेश्वर,रविदासजी महाराज ते परमहंस योगानंद, रमण महर्षि आणि स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत योगाच्या विकासात योगदान देणारे हजारो योगी आहेत.
 
 योगाचा संशोधनावर आधारित इतिहास
 
1 प्रभू श्रीरामाच्या काळात योग -नवीन संशोधनानुसार भगवान श्री राम यांचा जन्म इ.स.पू.5114 मध्ये झाला होता. त्या वेळी महर्षि वशिष्ठ, विश्वामित्र आणि वाल्मीकिजी लोकांना योग शिकवायचे.
 
2 श्रीकृष्णाच्या काळात योग- संशोधनानुसार,भगवान श्रीकृष्णाचा जन्म 3112 इ.स.पू झाला.त्यांनी अर्जुनाला योगाची शिकवणी दिली.
 
3 सिंधू घाटी सभ्यता काळ -योगाभ्यासाचे प्रामाणिक चित्रण सुमारे 3000 इ.स.पू.सिंधू सभ्यतेच्या कालावधीतील मुद्रा आणि शिल्पमध्ये आढळते.या व्यतिरिक्त भारतातील पुरातन लेणी,मंदिरे आणि स्मारकांवर आजतायगत कोरलेली आहेत.
 
4 ऋग्वेद काळातील योग -जगातील पहिल्या ऋग्वेद पुस्तकात योगिक क्रियांचा उल्लेख आहे.हजारो वर्षाच्या मौखिक परंपरे नंतर 1500 इ.स.पू.वेद लिहिलेले आहेत.
 
5 महावीर स्वामींच्या काळात योग-भगवान महावीर स्वामींचा जन्म 599 इ.स.पू .झाला .त्यांनी योगाच्या जोरावर पंच महाव्रताचे तत्व प्रमाणित केले होते.
 
6 बौद्ध काळात योग- भगवान बुद्धांचा जन्म 483 इ.स.पू.झाला त्यांनी योगाआधारे अष्टांगिक मार्गाची निर्मिती केली.
 
7 आदि शंकराचार्यांच्या काळात योग- मठ परंपरेनुसार आदि शंकराचार्य यांचा जन्म इ.स.पू. 508 मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू इ.स.पू. 474 मध्ये झाला. इतिहासकारांच्या मते त्यांचा जन्म 788 इ.स.पू मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू 820 इ.स.पू मध्ये झाला.त्याच्याकडून योगाची नवीन परंपराची सुरूवात झाली.
 
8 महर्षि पतंजलीच्या काळात योग- महर्षी पतंजलीने योगाचे प्रामाणिक ग्रन्थ 'योगसूत्र'200 इ.स.पू.लिहिले.नंतर योगसूत्रावर योग शिक्षकांनी अनेक भाष्य लिहिले आहेत.
 
9 हिंदू तपस्वींच्या 13 आखाड्यात योग-सन 660 इ.स.मध्ये सर्वप्रथम आवाहन आखाड्याची स्थापना झाली.760 मध्ये अटळ,अखाडा ,862 मध्ये महानिर्वाणी अखाडा, 969 मध्ये आनंद अखाडा,1017 मध्ये निरंजन अखाडा आणि शेवटी 1259 मध्ये जूना आखाड्याच्या स्थापनेचा उल्लेख मिळतो.
 
10 गुरु गोरक्षनाथांच्या काळात योग-पतंजलीच्या योग सूत्रानंतर गुरू गोरक्षनाथांनी सर्वात प्रख्यात 'हठयोग प्रदीपिका' नावाचे ग्रन्थ लिहिले.या ग्रन्थाची सापडलेली सर्वात जुनी हस्तलिखित पंधराव्या शतकातील आहे.
 
11 मध्ययुगीन काळात योग- गुरु गोरक्षनाथ यांच्या 84 सिद्ध आणि नवनाथांच्या परंपरेनुसार, मध्ययुगीन काळात योगासने पुढे नेणारे बरेच मोठे संत होते. संत गोगादेवजी,रामसापीर,संत ज्ञानेश्वर, रविदासजी महाराज ते परमहंस योगानंद, रमण महर्षि आणि स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत योगाच्या विकासात योगदान देणारे हजारो योगी आहेत ज्यांनी योगाच्या विकासात आपले हातभार लावले आहेत.