Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 7th व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे भाषण
नवी दिल्ली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करीत आहेत. संबोधनाचे थेट अपडेट-
जगभरात योगामुळे प्रेम वाढलं
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढलं आहे."
कोरोना काळात योग आत्मविश्वासाचं माध्यम बनलं
कोरोना महामारीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, "जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगभरात पाय पसरले त्यावेळी कोणताही देश साधनं, सामर्थ आणि मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हात. परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं की, अशा कठीण प्रसंगी योगासनं आत्मविश्वास वाढवण्याचं मोठं माध्यम बनलं.
यंदाचा योग दिन डिजीटल
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदाचा योग दिन हा डिजीटल स्वरुपात साजरा केला जात आहे. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे सामूहिक कार्यक्रम यंदा पहायला मिळणार नसल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी नागरिक हे आपल्या घरातच योगा करुन योग दिनाच्या कार्यक्रमात सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होत आहेत.
म्हणून २१ जून रोजी योग दिन
योग दिन प्रत्येक वर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. अनेकांना प्रश्न पडतो की, २१ जून रोजीच जागतिक योग दिन का साजरा केला जातो? याच उत्तर म्हणजे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रच्या महासभेत भाषण केले त्यावेळी योग दिनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इतर देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यानंतर संयुक्त राष्ट्राने 'जागतिक योग दिन' साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.