शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (14:28 IST)

MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, पाहा कोणता पेपर कोणत्या दिवशी होणार?

MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, पाहा कोणता पेपर कोणत्या दिवशी होणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात स्पष्ट होईल.
 
मुख्य परीक्षा 7,8,9 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये लागणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये लागेल.