1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
  4. New Born Baby Girl Wishes in Marathi

New Born Baby Girl Wishes in Marathi मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

Marathi wishes for baby girl
तुमच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले, 
त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन! 
ही परी तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो.
 
साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी 
तुमच्या घरात आनंदाची बरसात झाली आहे
कन्यारत्नाच्या प्राप्तीबद्दल खूप खूप अभिनंदन!
 
नव्या पाहुणीच्या आगमनाने तुमचे घर आनंदाने न्हाऊन निघो. 
चिमुकल्या परीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 
घरात आली एक छोटी परी, 
आनंदाने भरली तुमची पंढरी! 
कन्यारत्नाच्या आगमनाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
 
दोन इवल्याशा पावलांची चाहूल लागली 
आणि तुमचे आयुष्य आनंदाने बहरले. 
तुमच्या गोड परीचे स्वागत असो!
 
तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पर्वाची सुरुवात झाली आहे. 
या इवल्याशा परीला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद.
 
आई-बाबांची लाडकी आणि घराची शान, 
तुमची ही छोटी परी वाढवू दे तुमचा मान. अभिनंदन!
 
तुझ्या अंगणात आली आहे खरोखरची लक्ष्मी! 
लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप शुभेच्छा!
 
तुमच्या बागेत एक सुंदर कळी उमलली आहे
तिचे आयुष्य सुगंधाने आणि आनंदाने दरवळत राहो, हीच सदिच्छा.
 
तुमच्या घरी लक्ष्मी आली, 
आनंदाची पहाट झाली.
चिमुकल्या परीला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभो!
 
इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले, 
इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले! 
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा
 
कन्यारत्नाच्या रूपाने ईश्वराचे 
सर्वात सुंदर वरदान तुम्हाला मिळाले आहे
तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन!
 
पहिली बेटी, धनाची पेटी! 
कन्यारत्न झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या घरात परी आली, 
सुखाची ही शिदोरी आली
नवीन आई-बाबांना या गोड प्रवासासाठी खूप शुभेच्छा!
 
तुमच्या जीवनातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे
तुमच्या लाडक्या परीला खूप खूप आशीर्वाद आणि पालकांना शुभेच्छा!
 
स्वप्न सुखाचे, 
घर आनंदाचे, 
आगमन झाले आज 
एका गोड परीचे! 
कन्यारत्न झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
 
जगातील सर्व सुख तुमच्या परीच्या झोळीत पडो, 
तिचे स्मितहास्य कायम तुमच्या घरात दरवळत राहो
 
घरात आली परी... 
घराला आली आली आनंदाची भरती! 
खूप खूप अभिनंदन
 
घरात चैतन्याची नवी पालवी फुटली आहे, 
कारण तुमच्या आयुष्यात एक चिमुकली परी आली आहे. 
अभिनंदन!
 
परीसारखी गोंडस मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन
बाळास उदंड आयुष्य लाभू दे, आरोग्य उत्तम राहू दे.
 
चिमुकलीची पावले तुमच्या आयुष्यात 
सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवोत
 
ही लेक तुमच्या संसाराला फुलासारखी फुलव! 
हार्दिक अभिनंदन
पुढील लेख
परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश All the best wishes in Marathi