गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (13:44 IST)

पर्याय अॅपरल मॅनेजमेंटचा

अलीकडच्या काळात फॅशन आणि अॅपरल्स क्षेत्राचा आवाका वाढताना दिसतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. तुम्हालाही फॅशनची आवड असेल तर अॅपरल मॅनेजमेंट हा करिअरचा चांगला पर्याय होऊ शकतो. या क्षेत्राची ओळख करून घेऊ या...
 
अॅ्परल क्षेत्र टेक्स्टाइल्स, फॅशन आणि टेक्नॉलॉजी यांचं अनोखं मिश्रण आहे. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात कल्पकता आणि डिझायनिंग या दोन गोष्टींना महत्त्व असतं तर अॅपरल उोगात निर्मितीपासून मार्केटिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्याव लागतं. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोन असायला हवा. फॅशन डिझायनर आणि प्रोडक्शन टीममधला मध्यस्थ म्हणून अॅपरल मॅनेजर काम करतो. कपड्यांच्या निर्मितीदरम्यान कारागिरांवर लक्ष ठेवण्यापासून, योग्य संवाद साधणं, कामाचं योग्य नियोजन करणं, कपड्यांच्या दर्जाची तपासणी करणं, ग्राहक आणि कंपनी यांच्यातलादुवा बनण्यासारखी कामंही त्यालाच करावी लागतात.
 
बॅचलर इन फॅशन टेक्नॉलॉजी, बीएससी इन फॅशन टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट, बॅचलर इन अॅपरल प्रोडक्शन, बॅचलर इन फॅशन मॅनेजमेंट, बॅचलर इन फॅशन मार्केटिंग, मास्टर इन फॅशन टेक्नॉलॉजीसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही अॅपरल मॅनेजर म्हणून काम करू शकता.
 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आदी विविध संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येईल.
अभय अरविंद