सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By

शेवटच्या क्षणी अशा प्रकारे परीक्षेची तयारी करा, मेरिटच्या यादीत नाव येईल

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 2020 पासून बोर्डाच्या परीक्षा यशस्वीपणे घेतल्या जात नव्हत्या. काही मंडळांनी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन केले होते तर काहींनी पूर्व बोर्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे निकाल तयार केले होते. मात्र, यंदा बोर्डाची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. सन 2022 मध्ये, CBSE आणि CISCE बोर्डासह, सर्व राज्ये देखील 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी सज्ज आहेत.
 
2 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर परीक्षा देणे ही काही सोपी गोष्ट नाही. या वर्षीही बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे अभ्यास केला होता आणि कुठेतरी ऑफलाइन परीक्षेची त्यांना भीती वाटत आहे. मात्र, मेहनत दुप्पट करून पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षा दिली, तर त्यात चांगले गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवता येते.
 
बोर्ड परीक्षा तयारी करण्याचे टिप्स
काही दिवसात बोर्डाच्या परीक्षांची तयारी कशी करायची ते जाणून घ्या.
 
1. परीक्षा देण्यापूर्वी त्या विषयांची उजळणी करण्याचे सुनिश्चित करा, ज्यांचा तुम्ही यापूर्वी चांगला अभ्यास केला आहे. यातून तुम्ही काय वाचले आहे ते तुमच्या लक्षात राहील आणि त्यासंबंधित काही प्रश्न आल्यास त्याचे उत्तर सहज लिहू शकता.
 
2. शेवटच्या क्षणी कोणत्याही नवीन विषयाचा अभ्यास करू नका. असे केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो आणि तुम्ही आधी काय अभ्यास केला आहे ते विसरू शकता.
 
3. परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या आणि पेपर देण्यापूर्वी तुमची रणनीती बनवा. तुम्ही कोणता विभाग प्रथम सोडवणार आहात आणि कोणत्या प्रश्नासाठी किती वेळ घालवायचा हे ठरवा.
 
4. शांत मनाने परीक्षा द्या आणि कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका.
 
5. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जातो. या दरम्यान, प्रत्येक प्रश्न नीट वाचा आणि कोणत्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते ठरवा.