शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (08:10 IST)

Career in Art :कला शाखेतून बारावी केली आहे, त्यांनी या क्षेत्रात करिअर करावे

आता बारावीची परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत, पण बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा, असल्यास कोणत्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन ते भविष्यात अधिक चांगले करिअर करू शकतात, ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी चिंता असते. 
 
आजच्या युगात प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. असे असूनही, जर कला शाखेतून बारावी झालेल्या विद्यार्थ्यांपुढे पुढे काय करावे असा प्रश्न उद्भवतो जेणे करून त्यांना चांगले कॅरिअर करता येईल.  तर कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक कोर्सेस आहे. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 बीए इन आर्ट -कला शाखेतील बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय खास आहे . कलेची आवड असलेले विद्यार्थी बारावीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ललित आणि परफॉर्मिंग आर्ट्सचे अभ्यासक्रम शिकता येतील. हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना संगीत, चित्रकला, नृत्यदिग्दर्शन, नाट्य, चित्रपट निर्मिती अशा क्षेत्रात आपले करिअर करता येते. 
 
2 बॅचलर इन ह्युमॅनिटी अँड सोशल सायन्स- हा कोर्स अशा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्यांना सामाजिक समस्यांचा तपशीलवार अभ्यास करायचा आहे. या पदवी अभ्यासक्रमाला बारावीनंतर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. देशातील प्रत्येक राज्यात असलेल्या महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम चालवले जातात.  अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देखील द्यावी लागते. 
 
3 बॅचलर ऑफ डिझाईन आणि अॅनिमेशन- ग्राफिक डिझायनिंगला आजच्या डिजिटल जगात खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर 2D आणि 3D अॅनिमेशन असलेले चित्रपट आपल्या देशात तसेच परदेशात बनू लागले आहेत. विद्यार्थ्यांना हवे असल्यास ते या क्षेत्रातही आपले करिअर करू शकतात. यासाठी विद्यार्थी बॅचलर ऑफ डिझाईन आणि अॅनिमेशन सारखे कोर्स करू शकतात. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना 2D आणि 3D अॅनिमेशन, फिल्म मेकिंगमधील अॅनिमेशन, ग्राफिक आणि वेब डिझायनिंग, ऑडिओ आणि व्हिडिओ एडिटिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स बद्दल समजावून सांगितले जाते.
 
4 बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स- हा कोर्स करून विद्यार्थी ललित कला, व्हिज्युअल आर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्स या क्षेत्रात करिअर करू शकतात. हा कोर्स केल्यानंतर बॅचलर डिग्री मिळेल. देशातील अनेक नामांकित संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम चालवला जातो. या कोर्सद्वारे  ग्राफिक डिझायनिंगमध्येही करिअर करू शकता. 
 
5 बीए एलएलबी- कायद्याचा अभ्यास करण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी ते करू शकतात. भविष्यात वकील किंवा न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे बंधनकारक आहे. बीए एलएलबीचा कालावधी 5 वर्षे आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सरकारने स्वतंत्र कायदा महाविद्यालयेही स्थापन केली आहेत.
 
6 बॅचलर ऑफ सायन्स (हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल)- हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल अँड टूरिझमशी संबंधित या कोर्सबद्दल दरवर्षी विद्यार्थी उत्सुक असतात . गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. कोणत्याही प्रवाहातील विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम देशातील अनेक शैक्षणिक संस्थांद्वारे आयोजित केला जातो.
 
7 बॅचलर इन जर्नालिझम- कला शाखेचे विद्यार्थीही पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअर करू शकतात. या क्षेत्रात भाषेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे हा अभ्यासक्रम हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये चालवला जातो.  हा कोर्स फक्त नामांकित संस्थेतूनच करावा. या अभ्यासक्रमाच्या मदतीने विद्यार्थ्यांना वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था आणि मीडिया हाऊससारख्या संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते.