गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?

shivaji
* छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी दुर्ग, पुणे येथे झाला.

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा जन्म छत्रपती शहाजीराजे भोसले ह्यांच्या पत्नी जिजाबाई ह्यांच्या पोटी झाला. 
 
ह्यांच्या जन्म झाल्यावर शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा, वाजत होता. 'शिवाजी' हे नाव त्यांना शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले.    
 
शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे होते. हे जास्त काळ त्यांच्या वडिलांसमवेत म्हणजे छत्रपती शहाजी राजेंसह राहायचे. छत्रपती शहाजी राजे ह्यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई मोहिते होत्या. ज्यांच्या पासून शहाजीं राजेंना एकोजीराव नावाचे पुत्र रत्नं झाले. छत्रपती शिवाजीराजे ह्यांच्या मातोश्री जिजाबाई ह्या जाधव कुळातील जन्मलेल्या विलक्षण प्रतिभावान महिला होत्या. 
 
ह्यांचे वडील एक सामर्थ्यवान सामंत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वावर त्यांच्या आईवडीलांचा खूप प्रभाव होता. लहानग्या वयातच त्यांना त्या काळातील वातावरण आणि घटनांची खूप चांगली जाण होती. सत्ताधारी वर्गावर ते फार चिडायचे आणि अस्वस्थ व्हायचे. स्वातंत्र्याची ज्योत लहानपणापासूनच त्यांच्या मनात पेटली.  त्यांनी आपले काही विश्वासू मित्र एकत्र केले. 
जस जस वय वाढले परकीय सत्तेचे बंधन तोडण्याचा त्यांचा संकल्प अधिकच दृढ होत गेला.