Death Anniversary छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी प्रकृती खालावत गेल्याने रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या 50 व्या वर्षी झाला. त्यांच्या सह त्यांच्या चवथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती झाल्या. एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षरांनी आजतायगत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील.
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.