सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (12:57 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या ?

Sai Bhonsale
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या पण त्यांच्या पत्नी विषयी माहिती कुठेही आढळून येत नाही. आज आम्ही सांगत आहोत त्यांच्या पत्नीनं विषयी माहिती. चला तर मग जाणून घेऊ या.
* छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे पहिले लग्न बालपणीच 1640 रोजी पुण्यातील लाल महालात मोठ्या थाटाने फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाई निंबाळकर ह्यांच्याशी झाले. सईबाई फलटणच्या मुधोजीराजे निंबाळकर ह्यांचा कन्या होत्या. सईबाईंना संभाजी राजे पुत्र म्हणून लाभले.  
* छत्रपती शिवाजी महाराज ह्याचे दुसरे लग्न वर्ष 1641 रोजी शिर्के घराण्यातील सगुणाबाई शिर्के ह्यांच्याशी झाले. सगुणाबाई ह्यांना राजकुवरबाई नावाच्या कन्यारत्न होत्या.
 * छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे तिसरे लग्न 1650 मध्ये मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या भगिनी आणि तळबीडच्या संभाजी मोहिते ह्यांच्या कन्या सोयराबाईंसह झाले. ह्या मोहिते घराण्यातील होत्या. ह्यांना राजाराम राजे अपत्य म्हणून प्राप्त झाले.
 
* छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी चवथे लग्न बाजी प्रभू प्रधान ह्यांची कन्या आणि पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर ह्यांचाशी 1653 मध्ये केले. महाराजांनी देह सोडल्यावर ह्या देखील त्यांच्या समवेत रायगडावर सती झाल्या.
* छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवे लग्न विचारे घराण्यातील लक्ष्मीबाईं विचारे ह्यांच्याशी जावळीच्या गुप्त मोहिमेवर गेलेले असताना 1656 मध्ये केले.
* छत्रपती शिवाजी महाराजांचे सहावे लग्न गायकवाड घराण्यातील सकवारबाई ह्यांच्याशी 1657 मध्ये झाले. सकवारबाई गायकवाड या नांदोजीराव गायकवाड ह्यांच्या कन्या आणि शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड ह्यांच्या भगिनी होत्या. ह्यांना कमलबाई म्हणून कन्यारत्नाची प्राप्ती झाली.
*  सिंदखेडच्या जाधव घराण्यातील काशीबाई जाधव ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या. ह्यांचे लग्न 1657 रोजी झाले. काशीबाईंचे वडील संताजी जाधवराव आणि आजोबा अचलोजी  जाधवराव हे आई साहेब जिज़ाऊंचे बंधू होते. 
*  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होण्याचे मान विदर्भातील चिखलीच्या इंगळे घराण्यातील सरदार शिवाजीराव इंगळे ह्यांची कन्या गुणवंताबाई इंगळे ह्यांना मिळाले. ह्यांचे लग्न 1657 मध्ये झाले.