गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By
Last Modified: शनिवार, 9 जानेवारी 2021 (09:52 IST)

हिवाळी टिप्स : बदलत्या हवामानात या प्रकारे घ्या मुलांची काळजी

सध्या हिवाळ्याच्या हंगामात कधी थंड तर कधी उष्ण हवामान होत. अशा परिस्थितीत मुलांवर या बदलत्या हवामानाचा परिणाम होतो. त्यांची विशेष काळजी घ्यावयाची असते.
 
 बालरोग तज्ज्ञ सांगतात की मुलांची प्रतिकारक शक्ती कोणत्याही अति हवामानामुळे कमकुवत असते आणि कडाक्याच्या थंडीत तर त्यांची विशेष काळजी घ्यावयाची असते. अशा परिस्थितीत मुलांना उबदार कपडे घालून ठेवण्यासह त्यांना रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे आहार देणं देखील महत्त्वाचे आहे. या साठी मुलांना हिरव्या पालेभाज्या आणि फळे अवश्य द्यावे. पोषक घटकांनी समृद्ध ताजे आणि गरम अन्न घेणं रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. 
 
या हंगामात मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप येणं ही सामान्य बाब आहे. पण कोरोनाकाळाला लक्षात घेत पालकांना विशेष प्रकारे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मुलांना घेऊन बाहेर अत्यंत गरज असेल तरच जावं. कानात आणि नाकात संक्रमण थंडीमुळे सर्वात जास्त होत. म्हणून घरात देखील जास्त थंडी असल्यास कान आणि नाक झाकून ठेवा.
 
हिवाळ्यात घशात आणि छातीत जास्त त्रास होतो म्हणून मुलांना पिण्यासाठी कोमट पाणी द्या. तळपायातून थंडी शरीरावर वाईट परिणाम करते आणि मुलं अनवाणीच चालतात या सर्व गोष्टींपासून त्यांना वाचवायचे असते. पायात उबदार मोजे आणि जोडे घाला परंतु चांगले ऊन आल्यावर हात आणि पाय सूर्यप्रकाशात काही वेळ उघडे ठेवा जेणे करून मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची आवश्यकता हिवाळ्यात देखील पूर्ण होईल.
 
पाया प्रमाणेच डोक्याला देखील थंडीपासून बचावाची गरज आहे, बाहेर जाण्यापूर्वी मुलांना डोक्याला टोपी घाला. वाढत्या थंडीमध्ये मुलांना सर्दी, अतिसार आणि श्वास घ्यायला त्रास होतो. अशा परिस्थितीत ज्या मुलांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा दम्याचा त्रास असल्यास त्यांना श्वास घेण्यास त्रास होण्या सारख्या समस्या वाढतात. अशा परिस्थितीत मुलांना थोडंही संसर्ग झाल्यावर त्वरितच वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचे आहे.
 
बाहेर निघताना मुलांना आवर्जून मास्क लावावा. या मुळे कोरोनापासून बचाव होतो आणि बऱ्याच हंगामी रोगांपासून देखील संरक्षण होतं. जास्त थंडी वाढल्यामुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीवर देखील परिणाम होतो. आणि मुलांच्या संदर्भात तर हमखास असं होतं.
 
कुटुंबात किंवा बाहेरून येणाऱ्या माणसाला सर्दी पडसं झाले असल्यास मुलांना त्यांच्या पासून लांब ठेवावं. मुलांना शारीरिक आणि मानसिक दृष्टया तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांच्या कडून हलका व्यायाम करवावा आणि व्यायाम करण्याची सवय लावावी.
 
तज्ज्ञाच्या मते हवामानाशी जुळवून घेण्यास मुलांना थोडा वेळ लागतो आणि त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यांच्या साठी तर ही अधिकच वाईट परिस्थिती असते. अशा परिस्थितीत थंडीमध्ये मुलांना सक्रिय ठेवून बचाव करण्याचे प्रभावी प्रयत्न करावे. कोरोनाकाळात 'सावधगिरीचं हा बचावाचा उपाय आहे 'हे समजून घेणं आणि आपल्या जीवनात आणणे हे फार महत्त्वाचे आहे.