गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By

Kids Care : बाळाला कधी आणि कसा द्यावा मांसाहार?

मांसाहारी करणाऱ्या लोकांचे प्रमाण आहे. तसेच यातून मुबलक प्रमाणात प्रथिने मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात. लहान बाळालाही अनेकजण मांसाहार खाण्याची सवय लागतात. परंतु, बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याला मांसहार देणे टाळावे कारण हे पदार्थ पचवणे त्याला कठीण जाते. यामुळे त्यांना मांसहारी पदार्थ कधी आणि कसा द्यावा हे पाहुया…
 
अंडी – बाळाला दहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला सुरुवातील अंडी द्यावीत. हा प्रथिने मिळवण्याचा एक उत्तम स्रोत आहे. तसेच पचायलाही हलका असल्याने याचा त्याला त्रास होण्याचा धोका कमी असतो.
 
मासे – बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासे द्यावेत. हे पचायला लागल्यावर हळूहळू चिकन देण्यास सुरुवात करावी. परंतु सुरुवातीला फक्त सूप द्यावे आणि एक महिन्यानंतर मांसाचे तुकडे द्यायला सुरुवात करावी.
 
चिकन – बाळ 13 ते 14 महिन्यांचे झाल्यावर त्याला चिकन किंवा मासे खायला देण्यास काहीच हरकत नाही.
 
जास्त शिजवू नये – बाळ तीन वर्षाचे होईपर्यंत त्याला मांस किंवा मासे नेहमी भाजून, वाफवून किंवा उकडून द्यावे.
 
प्रमाणात द्यावे – बाळाला आठवड्यातून दोनदाच मांसाहारी पदार्थ खायला द्यावेत. मासे किंवा चिकन पचनास जड असल्याने ते अधिक प्रमाणात खाल्ल्यास बाळाचा मेटॅबॉलिक दर कमी होण्याचा धोका असतो. बाळाला मांसाहार दुपारच्या जेवणात न देता, रात्रीच्या जेवणात द्यावा.