लाडोबा, लाडोबा
लाडोबा, लाडोबा दमलास का?
दप्तर ओझं, थकलास का?
मित्रांशी भांडून आलास का?
आईच्या मागे लपलास का?
आईचा आधार चिरेबंदी
मित्रांचा जमाव जायबंदी
दमलास बाळा, घे खाऊ
म्हणेल आई, काय देऊ?
तूप खजूर दे आई,
हाती वाटी खाईन मी
तुपात पडली गोमाशी
लाडोबा राहिला उपाशी!