शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालदिन
Written By वेबदुनिया|

बालदिन म्हणजे काय??

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंती निमित्त दरवर्षी बालदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लहान मुलं म्हणजे पंडितजींचा जीव की प्राण. मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं ते म्हणायचे.
 
पण भारतातल्या अनेक, किंबहुना प्रत्येक ब्रिजवर ही अशी उमलण्यापूर्वीच कोमेजून गेलेली मुलं दिसतात, तेव्हा प्रत्येक नागरिकाचा जीव कासावीस होतो.


स्वतः दुर्गंधीत राहत असले तरी इतरांना सुगंध मिळावा यासाठीचा हा भाबडा प्रयत्न.

सत्तेच्या, स्वार्थाच्या राजकारणात आपलं कर्तव्य, जबाबदारी विसरलेल्या, मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या प्रशासनाला हा फुलविक्रेता 'गेट वेल सून' अशा सदिच्छा तर देत नसेल?
 
शेवटी हीसुद्धा मुलंच. कधीतरी एखादी गोष्ट त्यांच्या मनात भरते. आपल्याकडेही ती असावी, असंही त्यांना वाटत असेल. पण, या सगळ्या इच्छा आकांक्षांना मुरड़ घालण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.

सगळ्याचं जीवन प्रकाशमान करणा-या सूर्याला ही मुलं साद घालतायत. आमच्या आयुष्यातला अज्ञानाचा, गरिबीचा अंधार दूर होऊ दे, अशी प्रार्थना ते सूर्यनारायणाला करत आहेत. शाळेत जाण्याची संधी मिळाली, तसाच पुढचा मार्गही सोपा होऊ दे, हीच त्यांची इच्छा असणार!