Last Modified: मुंबई , गुरूवार, 14 ऑक्टोबर 2010 (11:08 IST)
पदक विजेते होणार क्लासवन अधिकारी
कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी करणार्या राज्यातील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने प्रथम श्रेणी अधिकारी होण्याची ऑफर दिली आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली असून, या खेळाडूंना सरकारी नौकरी दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुवर्ण पदक जिंकणार्या खेळाडूला 10 लाख, रोप्य जिंकणार्याला 7.5 लाख तर कांस्य पदक जिंकणार्या खेळाडूला पाच लाख रुपयांचा पुरस्कारही दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.