1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. राष्ट्रकुल स्पर्धा 2010

हॉकीत भारताचा लाजीरवाना पराभव

पा‍किस्तान व इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत हॉकी फायनलमध्ये प्रवेश केलेल्या भारताला आज कांगारुंविरोधात लाजीरवाना पराभव स्विकारावा लागला.

आज झालेल्या फायनल सामन्यात भारताला एकही गोल करता आला नाही, तर कांगारुंनी 8 गोल करत भारताला नमवले.

या सामन्यात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन संघ आक्रमक खेळ करताना दिसूत होता. भारतीय बचावफळीचा कमकुवतपणा या सामन्यात दिसून आला.
यानंतर आता भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असून, न्यूझीलंड संघाला कांस्य पदक मिळाले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा