मनमोहनच्या विजयाने अमेरिकेत जल्लोष
|
भारतात अमेरिकेचे राजदूत असलेले डेविड मलफोर्ड यांनी मंगळवारी रात्री माध्यमांसाठी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकात डॉ.सिंग यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या असून अमेरिका दोन्ही देशातील अणू करारासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी सांगितले, की आम्ही भारतासोबत आयएईए, एनएसजी आणि अमेरिकी कॉंग्रेसमध्ये या करारास लवकरात-लवकर मंजुरी मिळविण्यासाठी सोबत काम केले जाणार आहे.
आयएईएकडून यास मंजुरी मिळाल्यानंतर करार 45 सदस्यांच्या एनएसजीमध्ये पाठविला जाईल. आणि नंतर त्यास अमेरिकी संसदेत मंजुरीसाठी आणले जाणार आहे.
