लोकशाहीचे मंदिर असलेल्या सभागृहात पैशांचा पाउस करून आपणास खरेदी केल्याचा आरोप होतो ही निश्चितच दुःखद आणि व्यतित करणारी घटना आहे. लोकशाहीच्या आजवरच्या प्रतिष्ठेला या घटनेने कलंक लावला असल्याची प्रतिक्रिया लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी सभागृहात व्यक्त केली.